शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
2
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
3
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
4
जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक
5
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ
6
सोन्याच्या किमतीचा नवा विक्रम! १० ग्रॅमसाठी तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या
7
"क्रिकेटपटूंनी विवस्त्र फोटो पाठवले, शिविगाळ केली, एकाने तर…’’, मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे सनसनाटी आरोप 
8
सासू जावयानंतर आता बिर्याणीवाला...; कामावर ठेवलेला पोरगाच मालकाच्या पत्नीला पळवून घेऊन गेला
9
बदल्याची आग! उपचाराच्या बिलामुळे झाला कर्जबाजारी, रुग्णालयात चोरी करणारा हायटेक चोर
10
एसबीआयमध्ये १००००० रुपयांवर मिळतंय २४,६०४ चे निश्चित व्याज; एफडीचा कालवधी किती?
11
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
12
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
13
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
14
वरमाला पडली अन् नवरदेवाने दिलेले दागिनेच खोटे निघाले; मग काय नवरीने...
15
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
16
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
17
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
18
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी
19
"म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे...", आताच्या मालिकांवर रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
20
"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान    

लोकनियुक्त सरपंचांच्या 'या' अधिकारामुळे विरोधकांना उपसरपंच पदापासूनही रहावे लागणार दूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 16:09 IST

नव्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा

अजय जाधवउंब्रज : उपसरपंचपदाच्या निवडणुकीत थेट लोकांतून निवडून आलेल्या सरपंचास शासनाने वेळप्रसंगी दोन मते देण्याचा अधिकार बहाल केला आहे. यामुळे सरपंचाच्या विरोधी गटास काठावरील बहुमत मिळालेले असले तरीही उपसरपंचपदापासून लांब राहण्याची वेळ आली आहे.उपसरपंच निवडणुकीमध्ये थेट निवडून आलेल्या सरपंचास मतदान बाबत जे अधिकार आहेत. त्याबाबत महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांना शासनाच्या ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी सुनील माळी यांनी ३० सप्टेंबर २०२२ रोजी लेखी कळवले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम ३३ सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणुकीची कार्यपद्धती विषद करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये पहिल्या फेरीत सरपंचांना मतदानाचा अधिकार असेल. त्या निवडणुकीमध्ये समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देण्याचा हक्क असेल.

उपसरपंचाची निवडणूक ही सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेणे व उपसरपंच यांची निवड करणे कायद्याने बंधनकारक असल्याने उपसरपंच निवडणुकीचे अध्यक्षस्थान भूषवून त्याप्रमाणे कार्यवाही करणे हे सरपंच यांच्या कर्तव्याचा भाग आहे. उपसरपंचपदाची निवडणुकीची सभा तहकूब झाल्यास मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ च्या नियम १२ मधील तरतुदीनुसार सभा त्या कारणासाठी दुसऱ्याच दिवशी तत्काळ घेण्यात यावी. उपसरपंचाच्या निवडणुकीकरिता अपरिहार्य कारणास्तव सरपंच उपस्थित राहण्यास असमर्थ असतील तर जिल्हाधिकारी यांनी सदर कारणाची खातरजमा करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ चे कलम ३३ मधील पोट कलम ६(४) मधील तरतुदीस अनुसरून तत्काळ पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करावी. जेणे करून विहित कालावधीमध्ये पंचायतीचे स्थापन होणे शक्य होईल. अशी सूचना देण्यात आली आहे.नव्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चाएखाद्या ग्रामपंचायतीची ग्रामपंचायत सदस्य संख्या ही ९ आहे. ज्या गटाचा सरपंच लोकनियुक्त म्हणून निवडून आलेला आहे त्या गटाचे चार सदस्य निवडून आलेले आहेत. तर विरुद्ध गटाचे पाच सदस्य निवडून आलेले आहेत. उपसरपंच निवडीच्या वेळी सरपंच हे आपल्या गटाच्या उपसरपंच उमेदवारास मतदान करतील. त्यामुळे दोन्ही गटाची मते समसमान होतील.यानंतर पुन्हा निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंच यांना देण्यात आल्यामुळे त्याच्या गटाच्या उमेदवारास ते निर्णायक मत देतील. बहुमत नसताना दोन मताचा अधिकार मिळाला असल्यामुळे सरपंच गटालाच उपसरपंचपद मिळून जाईल. यामुळे या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsarpanchसरपंच