नितीन काळेलसातारा : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून, यंदा पहिल्या अडीच वर्षांसाठी ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी अध्यक्षपद राखीव झाले आहे. त्यामुळे १८ वर्षांनंतर ओबीसी महिला अध्यक्ष होणार आहे. त्यातच जिल्ह्यात ओबीसी महिलांसाठी एकूण ९ गट आरक्षित असून, खटाव आणि कराडमधील महिलेला अध्यक्षपदी संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. तरीही सर्वच ओबीसी महिला गटांत हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे.सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी होत आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. जिल्हा परिषदेत ओबीसी प्रवर्गातून एकूण १७ जण निवडून जाणार आहेत. यामधील ९ गट हे महिलांसाठी आरक्षित आहेत.यामध्ये जावळी, सातारा आणि कोरेगाव तालुक्यांत प्रत्येकी एक गट तसेच खटाव, पाटण अन् कराड तालुक्यांत प्रत्येकी दोन गट आरक्षित आहेत. त्यामुळे या तालुक्यांतीलच महिला अध्यक्ष होऊ शकते, हे सत्य आहे. तरीही खऱ्या अर्थाने खटाव आणि कराड तालुक्यांतीलच ओबीसी महिला अध्यक्ष होईल, असाच अंदाज सध्यातरी बांधला जात आहे.
...तर अतुल भोसले दावा करणार!कराड तालुक्यात विंग आणि काले हे दोन गट ओबीसी महिलेसाठी राखीव आहेत. हे दोन्ही गट कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात येतात. भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार डाॅ. अतुल भोसले हे या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. त्यांच्या मतदारसंघातील या गटातून भाजपकडून ओबीसी महिला निवडून आल्यास ती अध्यक्ष पदाची दावेदार ठरू शकते. कारण, डाॅ. भोसले यांना मंत्रिपद मिळाले नाही. निवडणुकीत भाजपचे सदस्य अधिक संख्येने निवडून आल्यास डाॅ. भोसले यांच्या शब्दाला भाजपच्या वरिष्ठांकडूनही ना असणार नाही. त्यामुळे अतुल भोसले हे अध्यक्षपद मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतात.
ओबीसी महिला आरक्षित गट असे...
- जावळी तालुका - कुडाळ
- कोरेगाव तालुका - वाठार स्टेशन
- खटाव तालुका - बूध अन् औंध
- पाटण तालुका - मल्हारपेठ अन् मारुल हवेली
- सातारा तालुका - कोडोली
- कराड तालुका - विंग अन् काले
यापूर्वी वाईच्या हेमलता ननावरे अध्यक्ष...सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची संधी आतापर्यंत सर्वच तालुक्यांना मिळालेली आहे. सुरूवात कराड तालुक्यापासून झाली तर शेवटचा क्रमांक खंडाळ्याचा लागला. तर आता १८ वर्षांनंतर ओबीसी प्रवर्गातील महिला अध्यक्ष होणार आहे. यापूर्वी वाई तालुक्यातील हेमलता ननावरे या अध्यक्ष झाल्या होत्या. १८ मार्च २००५ ते २० मार्च २००७ या काळात ननावरे या अध्यक्ष होत्या.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार !
- माण विधानसभा मतदारसंघात औंध गट येतो. त्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे औंध गटावर लक्ष ठेवून आहेत. भाजपचा उमेदवार गटातून विजयी झाल्यास ते अध्यक्ष पदासाठी जोरदार लाॅबिंग करू शकतात.
- खटाव तालुक्यातील बूध गटही ओबीसी महिलांसाठी राखीव असला तरी तो कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येतो. आमदार महेश शिंदे यांचेही या गटावर लक्ष असणार आहे.
- सातारा तालुक्यातील कोडोली गटही कोरेगाव मतदारसंघात आहे. येथेही ओबीसी महिलांसाठी आरक्षण आहे. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील कुडाळ गटातही ओबीसी महिला आरक्षण असल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही उमेदवार निवडून आल्यास अध्यक्षपद खेचण्यासाठी दंड थोपटणार आहेत.
- पाटण विधानसभा मतदारसंघातही दोन गट ओबीसी महिलांसाठी राखीव असल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई हेही या गटांवर अधिक लक्ष केंद्रित करतील.
Web Summary : Satara Zilla Parishad's president post is reserved for OBC women after 18 years. Key contests are expected in Khatav and Karad, with leaders vying for influence. BJP's Atul Bhosale eyes a chance if his candidate wins, making it a prestige battle.
Web Summary : सतारा जिला परिषद में 18 साल बाद ओबीसी महिला अध्यक्ष होंगी। खटाव और कराड में मुकाबला कड़ा है, जहाँ नेता प्रभाव के लिए प्रतिस्पर्धा कर रहे हैं। बीजेपी के अतुल भोसले की निगाहें अवसर पर हैं, जिससे यह प्रतिष्ठा की लड़ाई बन गई है।