शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा तडाखा, साताऱ्यात फेब्रुवारीतच ‘ताप’मान ३६ अंशांवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:09 IST

एप्रिल-मे महिन्यांतील झळा असह्य होणार

सातारा : जिल्ह्यात जानेवारी महिन्यातच थंडी पळाल्याने फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढत गेली. त्यामुळे जिल्ह्याचे कमाल तापमान ३७ अंशांजवळ पोहोचले. तर सातारा शहरात ३६.२ अंशांची नोंद झाली आहे. फेब्रुवारीतच उन्हाची तीव्रता वाढल्याने एप्रिल आणि मे महिन्यांतील उन्हाळी झळा असह्य होणार, हे स्पष्ट होत आहे.जिल्ह्यात फेब्रुवारीअखेरीसपर्यंत थंडी जाणवते; पण यावर्षी थंडीची तीव्रता कमी दिसून आली. जानेवारी महिन्यातही थंडी कमी होती. त्यामुळे यंदा उन्हाची तीव्रता लवकरच जाणवणार, असा अंदाज वर्तविण्यात आलेला. हा अंदाज खरा होताना दिसत आहे. कारण, फेब्रुवारी महिना सुरू झाल्यापासूनच कमाल तापमानात वाढ होत चालली आहे. तर किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. यामुळे काहीवेळा पहाटेच्या सुमारास काही प्रमाणात थंडी जाणवते. तरीही कमाल तापमानात वाढ असल्याने उन्हाळी झळा जाणवू लागल्या आहेत.त्यातच जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कडक उन्हाळ्याला सुरुवात होते. कमाल तापमान ४० अंशांपर्यंत जाते. जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत तर पारा ४२ अंशांपर्यंत पोहोचतो. तर सातारा शहराचे कमाल तापमान ४० अंशांचा टप्पा पार करते. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असलेतरी तेथील पाराही ३८-३९ अंशांपर्यंत जातो; पण यंदा फेब्रुवारीतच पारा वाढत चालला आहे. त्यामुळे पुढील काळात उन्हाळा आणखी कडक होत जाणार आहे.

सातारा शहराचे कमाल तापमान मागील काही दिवसांपासून वाढतच चालले आहे. त्यातच मागील आठवड्यात तीनवेळा पारा ३५ अंशांवर गेला. यामुळे दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. तर माण, खटाव तालुक्यांत दुपारच्या सुमारास उन्हाळी झळा जाणवू लागल्या आहेत. उकाड्यातही वाढ झाली आहे. त्याचबरोबर महाबळेश्वर शहराचा पाराही वाढला आहे. कमाल तापमान ३१ अंशांवर जात आहे. यामुळे जिल्ह्यातून थंडी जवळपास संपल्याचेच स्पष्ट होत आहे.

सातारा शहरातील कमाल तापमान..दि. ५ फेब्रुवारी ३३.६, ६ फेब्रुवारी ३४.४, ७ फेब्रुवारी ३३.७, ८ फेब्रुवारी ३४, ९ फेब्रुवारी ३४.२, १० फेब्रुवारी ३४.३, ११ फेब्रुवारी ३४.६, १२ फेब्रुवारी ३५.६, दि. १३ फेब्रुवारी ३४.७, १४ फेब्रुवारी ३४.४, १५ फेब्रुवारी ३५.२, १६ फेब्रुवारी ३५.२ आणि दि. १७ फेब्रुवारी ३६.२

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामानTemperatureतापमान