शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

बाजार समित्या उघडल्या, व्यवहार सुरू झाले; साताऱ्यात एक कोटींची उलाढाल 

By नितीन काळेल | Updated: February 27, 2024 18:47 IST

कांदा अन् बटाट्याची मोठी आवक

सातारा : केंद्र शासनाने बाजार समितीच्या धोरणात बदल करुन कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ बंद ठेवण्यात आलेल्या बाजार समित्या मंगळवारी सुरू झाल्या. त्यामुळे एक कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. त्याचबरोबर सातारा बाजार समितीत तर कांदा आणि बटाट्याची मोठी आवक झाल्याचे दिसून आले.जिल्ह्यात सातारा, फलटण, कऱ्हाड, वाई या बाजार समितीत दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. तसेच भुसार मालाचीही आवक होते. तर खंडाळा तालुक्यातील लोणंद बाजार समिती कांद्यासाठी प्रसिध्द आहे. याठिकाणी आठवड्यातून दोन दिवस कांद्याची मोठी आवक होते. पण, केंद्र शासनाने बाजार समितीच्या धाेरणात काही बदल केला आहे. यामुळे निवडणूक न होता बाजार समितीवर कायम प्रशासक नियुक्तीचा निर्णय घेतला. याच्या निषेधार्थ सोमवारी संपूर्ण राज्यातील बाजार समित्या एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या.यामध्ये सातारा जिल्ह्यातील समित्यांनाही सहभाग घेतला. यामुळे बाजार समित्यांकडे शेतकरी फिरकलेच नाहीत. तसेच आवारात शुकशुकाटच दिसून आला. तर बंदच्या एका दिवसातच जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीतील सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल थांबली. यामध्ये सातारा बाजार समितीतील सुमारे ५० लाखांच्या उलाढालवर परिणाम झाला होता. पण, मंगळवारी पुन्हा बाजार समित्या सुरू झाल्या.

सातारा, कऱ्हाडसह इतर बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. भाजीपाल्यासह भुसार मालाचीही आवक झाली. सातारा बाजार समितीत तर मंगळवारी ४६७ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. तसेच कांदा २७९ आणि बटाटा ३५७, लसूण ३६ आणि आलेचीही १७ क्विंटलची आवक राहिली. त्याचबरोबर मेथीच्या दीड हजार तर कोथिंबीरच्या तीन हजार पेंड्यांची आवक झाली.तर पपई, पेरु, खरबूज, द्राक्षे, चिकू आदी फळांचीही ५९ क्विंटलची आवक झाली. यामुळे बाजार समितीतील उलाढाल वाढल्याचे दिसून आले. सातारा बाजार समितीत सध्या वांगी, फ्लाॅवर, दोडका, कारली, हिरवी मिरची, भेंडी, पावटा आणि गवारला चांगला दर मिळत असल्याचे दिसून आले. तर कांद्याच्याही दरात थोडी वाढ झालेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarket Yardमार्केट यार्ड