शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा संपला; सातारा जिल्ह्यात ६५ टक्केच बरसला; दुष्काळी भागात चिंताजनक स्थिती  

By नितीन काळेल | Updated: October 2, 2023 19:06 IST

तब्बल ३०६ मिलीमीटर तूट  

सातारा : जिल्ह्याला मान्सूनच्या पावसाने दगा दिला असून पावसाळ्याच्या चार महिन्यात अवघा ६५ टक्के बरसला आहे. त्यामुळे यावर्षी तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट निर्माण झाली आहे. त्यातच सर्वच तालुक्यातही कमी पर्जन्यमान झाले असून दुष्काळी भागात तर पाझर तलाव, ओढे कोरडे असल्याने चिंताजनक स्थिती आहे.जिल्ह्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे जून महिन्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचे गणित सुरू होते. यंदा मात्र, हवामान विभागाने चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तविलेला. पण, सातारा जिल्ह्यासाठी तरी हा अंदाज खोटा ठरला. कारण, जूनपासून सप्प्टेंबरपर्यंतच्या पावसाळ्याच्या चार महिन्यात पावसाने सतत दगा दिला आहे. फक्त जुलै महिन्यात चांगले पर्जन्यमान झालेले. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत पावसाची उघडझाप राहिली. त्यातच आतातर मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने यापुढे चांगला पाऊस होईल ही आशा मावळली आहे. तर पावसाळच्या चार महिन्यात फक्त ६५.०४ टक्केच पाऊस झालेला आहे.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ८८६.०२ मिलीमीटर पाऊस होणे अपेक्षित असते. यंदा ३० सप्टेंबरअखेर फक्त ५७९.६ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. याचाच अर्थ तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट आहे. त्याचबरोबर सर्वच तालुक्यात कमी पावसाची नोंद आहे. १०० टक्के पाऊस कोणत्याही तालुक्यात झालेला नाही. यामध्ये सर्वात कमी पाऊस कोरेगाव तालुक्यात ४८ टक्केच झाला आहे. तर सर्वाधिक पाऊस सातारा तालुक्यात ७६ टक्क्यांपर्यंत पडला आहे. त्यामुळे इतर तालुक्यातील पावसाची स्थिती समजून येते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसdroughtदुष्काळ