शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

डोंगर बनला काळ, मोडून पडला संसार!; पाटण तालुक्यातील भूस्खलनाच्या भयानक आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 12:08 IST

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या पाटण तालुक्यातील सुमारे ४२ गावांवर गतवर्षी २२ जुलै रोजी काळाने घाला घातला. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन अनेकांचे संसार अकराळविकराळ डोंगराखाली गाडले गेले.

नीलेश साळुंखेकोयनानगर : निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या पाटण तालुक्यातील सुमारे ४२ गावांवर गतवर्षी २२ जुलै रोजी काळाने घाला घातला. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन अनेकांचे संसार अकराळविकराळ डोंगराखाली गाडले गेले. आंबेघर, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी या गावांतील अनेकांचा या ढिगाऱ्याखाली बळी गेला. तर अनेकांचे घरदार, शेती भुईसपाट झाली. या घटनेला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले; पण तेथील भूस्खलनाच्या भयानक आठवणी आजही ग्रामस्थांच्या अंगावर शहारा आणतात.गतवर्षी २२ जुलै रोजी म्हणजेच मराठी महिन्यातील आषाढातील बेंदराच्या सणाला पाटण तालुक्यात हाहाकार उडाला होता. क्षणात होत्याचे नव्हते झाले. निसर्गाने विपरीत घडवले. जुलै महिन्यातील दमदार पावसाने भात लावणीच्या कामाला नुकताच वेग आला होता. ज्याच्या जीवावर आपला संसाराचा गाडा चालतो, त्या शिवाराच्या अन् गुराढोऱ्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी एक दिवस असतो, तो म्हणजे बेंदूर. गतवर्षी या सणादिवशी २२ जुलै रोजी पाटण तालुक्यातील शेतकरी आनंदात होते. शेतकऱ्यांनी दिवसभर गुराढोरांची सेवा केली. अंघोळ घालून तसेच विविध रंगांनी शिंगे रंगवून त्यांनी जनावरांना सजवले. दिवसभर शेत शिवाराला नैवेद्य दाखवला.

ऐन पावसात बेंदराची पूजा आटोपून रात्री नऊ-साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पोळी अन् आमटी ताटात घेऊन शेतकरी तोंडात घास घालणार एवढ्यात गोठ्यातील जनावरांनी हंबरायला सुरुवात केली. काही शेतकऱ्यांनी नुकतेच अंथरुणावर अंग टाकलेले तर काही जण जेवायला बसलेले. हातातला घास ताटात ठेवूनच ते बाहेर धावले. मात्र, तोपर्यंत काळाने त्यांच्यावर घाला घातला. ज्या डोंगरामध्ये शेतकऱ्यांनी आयुष्य घालवले तोच डोंगर त्यांच्यासाठी काळ बनून आला.

बेंदराचा सण मुळावर उठला!

कुणाला काही समजण्यापूर्वीच निद्रावस्थेत असलेल्या भूमिपुत्राला अन् मायेच्या कुशीत डोळे मिटलेल्या लेकरांना या डोंगराने गिळंकृत केले. दगड, मातीच्या ढिगाऱ्याखाली त्यांना गाडून टाकले. बेंदूर म्हणजे मुळाचा सण; पण गतवर्षीचा बेंदूर पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुळावरच उठला असे म्हणावे लागेल.

भूस्खलनात झालेले मृत्यूआंबेघर : १४ढोकावळे : ६मिरगाव : ११हुंबरळी : ०१बोंद्री : ०१जळव : ०१येराड : ०१मंद्रुळकोळे : ०१

टॅग्स :Satara areaसातारा परिसरpatan-acपाटणlandslidesभूस्खलन