शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

Satara Crime: अभ्यास अन् मोबाईल वापरावरून वाद, रूम पार्टनरने केला तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 19:03 IST

लोणंद पोलिसांनी अवघ्या दोन तासांत केला खुनाचा उलगडा

लोणंद : लोणंद (ता. खंडाळा) येथे माळीआळी परिसरात २२ वर्षीय तरुणाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली. गणेश संतोष गायकवाड (रा. पिंपळसुटी, ता. शिरूर, जि. पुणे, सध्या लोणंद) असे मृताचे नाव आहे. लोणंद पोलिसांनी अवघ्या दोन तासांत या खूनाचा उलगडा केला. रूम पार्टनरने हा खून केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर केले.अधिक माहिती अशी की, गणेश गायकवाड हा लोणंद एमआयडीसी परिसरात कामाला होता. तर संशयित शिक्षणासाठी लोणंद येथे राहत होता. दोघांची मेसमध्ये ओळख झाली आणि नंतर त्यांनी एकाच खोलीत भाड्याने राहण्यास सुरुवात केली. या दोघांमध्ये अभ्यास आणि मोबाईल वापरावरून वाद झाला. त्यानंतर गणेश झोपेत असताना संशयिताने रागाच्या भरात त्याचे डोके भिंतीवर आपटले आणि कमरेच्या पट्ट्याने गळा आवळला. यात गणेशचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फॉरेन्सिक, फिंगरप्रिंट व डॉग स्क्वॉड पथकांना घटनास्थळी पाचारण करून पुरावे हस्तगत केले. प्राथमिक चौकशीत खुनाची माहिती देणारा व्यक्ती हा त्याचाच रूम पार्टनर असल्याचे समोर आले. त्याच्या वागण्यात संशयास्पद हालचाली आढळल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली. अखेर पोलिसांच्या चौकशीत त्याच्याच कबुली जबाबातून या खुनाचा उलगडा झाला. सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, पो. उपनिरीक्षक रोहित हेगडे, डी.बी. पथकाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी घटनेचा तपास केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Argument Over Phone, Studies Leads to Roommate Murder

Web Summary : In Lonand, Satara, a 22-year-old was murdered by his roommate after a dispute over phone usage and studies. The suspect, a minor, confessed to the crime, admitting to hitting the victim's head against the wall and strangling him. Police arrested the suspect and are investigating.