शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या गावातीलच ग्रामसभेत धक्काबुक्की; पेयजल योजनेचा पाणी प्रश्न चिघळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 12:00 IST

सरपंचांची पोलिसांत तक्रार, दहा जणांवर गुन्हा

मल्हारपेठ : पेयजल योजनेच्या कामावरून सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे गाव असलेल्या मरळीच्या ग्रामसभेत वादावादी, धक्काबुक्की झाली. या वादानंतर सरपंचांनी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून दहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी घडली.सरपंच कांचन संभाजी पाटील (रा. मरळी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून, प्रवीण लक्ष्मण पाटील, धनाजी लक्ष्मण पाटील, जितेंद्र साहेबराव पाटील, संदेश सयाजी पाटील, शुभम शरद पाटील, संग्राम भीमराव पाटील, संजय विजय सणस, अनिकेत उत्तम पाटील, संजय एकनाथ पाटील, राजेंद्र रामचंद्र पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयात शनिवारी ग्रामसभेचे आयोजन केले होते. कांचन पाटील ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी उपसरपंच व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेतील सर्व विषय संपल्यानंतर परवानगी न घेता ऐनवेळेच्या विषयावेळी माजी सरपंच प्रवीण लक्ष्मण पाटील यांनी पेयजल योजना सुरळीत चालत नसलेबाबतचा विषय मांडला. त्यावर माजी उपसरपंच कृष्णा कदम यांनी पेयजल योजनेचे काम केलेले ठेकेदार यांना बोलावून कामाची चौकशी करू, असे ग्रामसभेमध्ये उत्तर दिले.त्यावेळी प्रवीण पाटील यांनी तुम्ही पाच वर्षे काय केले? असे म्हणत शिवीगाळ करू लागले. सरपंच त्यांना शांत राहणेबाबत सांगत होते. तरी त्यांनी काही न ऐकता प्रवीण पाटील व धनाजी पाटील यांनी कृष्णा कदम यांना तसेच संभाजी पाटील हे भांडणे सोडवायला गेले असता त्यांना अनिकेत पाटील, शुभम पाटील, संग्राम पाटील, संजय सणस यांनी धक्काबुक्की केली. तर विलास कदम यांना संजय पाटील यांनी श्रीमुखात लागावली. तसेच कृष्णा कदम यांच्या अंगावर राजेंद्र पाटील हे मारण्यासाठी धावून जात होते. प्रवीण पाटील व धनाजी पाटील यांनी ग्रामसभा घेऊ नका, बंद करा. तुम्हाला गावची कामे करता येत नाहीत, असे म्हणत ग्रामसभा बंद पाडली.पोलिस अधीक्षकांकडून घटनास्थळी पाहणीपालकमंत्री शंभूराज देसाई यांचे गाव असलेल्या मरळीतील ग्रामसभेत वाद झाल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतShambhuraj Desaiशंभूराज देसाई