फांद्या तोडल्यावरून दोन कुटुंबांत वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:39 IST2021-05-10T04:39:13+5:302021-05-10T04:39:13+5:30
सातारा : तालुक्यातील आरळे गावच्या हद्दीत जांभळीच्या झाडाच्या फांद्या तोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा ...

फांद्या तोडल्यावरून दोन कुटुंबांत वादावादी
सातारा : तालुक्यातील आरळे गावच्या हद्दीत जांभळीच्या झाडाच्या फांद्या तोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश पवार आणि कुसूम पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या दोघांनाही प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती यावेळी पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
याबाबतची अधिक माहिती अशी, शाहीन सलिम शेख (वय ४१, रा. आरळे, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शाहीन शेख आणि गणेश अंकुश पवार, कुसूम अंकुश पवार (दोघे रा. आरळे, ता. सातारा) हे समोरासमोर राहतात. शाहीन यांनी जांभळीच्या झाडाच्या फांद्या तोडल्यानंतर तुम्ही माझ्या झाडांच्या फांद्या का तोडल्या, अशी विचारणा गणेश आणि कुसूम या दोघांनी केली. यावेळी या दोघांकडून शाहीन आणि त्यांचे पती सलिम या दोघांना शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी, दि. ७ रोजी घडली असून याप्रकरणी शाहीन यांनी शनिवारी, दि. ८ रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गणेश आणि कुसूम या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी भेट दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चौधरी करत आहेत.