शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

क्षेत्र महाबळेश्वर : सहा दिवसीय कृष्णाबाई उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 15:52 IST

कृष्णाबाई माझे आई मजला ठाव द्यावा पायी या जयघोषात श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे सुरू असलेल्या सहा दिवसीय कृष्णाबाई उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. हजारो भाविकांनी भल्या पहाटे हा नेत्रदीपक सोहळा पाहिला.

ठळक मुद्देकृष्णाबाई माझे आई... मजला ठाव द्यावा पायी ! क्षेत्र महाबळेश्वर : सहा दिवसीय कृष्णाबाई उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता

महाबळेश्वर : कृष्णाबाई माझे आई मजला ठाव द्यावा पायी या जयघोषात श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे सुरू असलेल्या सहा दिवसीय कृष्णाबाई उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. हजारो भाविकांनी भल्या पहाटे हानेत्रदीपक सोहळा पाहिला.कृष्णाबाईचा उत्सव दरवर्षी कृष्णा नदी किनारी वसलेल्या वाई व कऱ्हाड यासह विविध ठिकाणी साजरा केला जातो. मात्र, या उत्सवाची सांगता श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे कृष्णा नदीच्या उगमस्थानी केली जाते. श्री कृष्णादी पंचगंगा देवस्थान ट्रस्ट व श्रीक्षेत्र महाबळेश्वर यांच्या वतीने या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.भल्या पहाटेच श्री कृष्णाबाईच्या प्रतिमेची चांदीच्या पालखीतून भव्य नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणीफटाक्यांची आतिषबाजी करून पालखीचे स्वागत करण्यात आले.

यावेळी कृष्णाबाई माझे आई मजला ठाव द्यावा पायी असा जयघोषही करण्यात आला. पालखी पंचगंगा मंदिरात आल्यावर कीर्तनकार भास्करबुवा काणे यांचे कृष्णाबाईच्या लळिताचे कीर्तन झाले. गंगा पूजनावेळी कुंडातील पाण्यामध्ये दिवे खेळविले गेले. यानंतर कृष्णाबाई उत्सवाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसरtourismपर्यटनTempleमंदिर