सातारा : कायदा व सुव्यवस्थेस गालबोट लागेल अशा घटना घडून नयेत, यासाठी महापुरुषांच्या जयंतीदिनी ज्याप्रमाणे ‘ड्राय डे’ साजरा केला जातो, त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी दि. १४ एप्रिल रोजी शासनाने ‘ड्राय डे’ जाहीर करावा, अशी मागणी रिपाइंसह विविध प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, या मागणीसाठी मंगळवारी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दि. १४ एप्रिल या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. जयंती कालावधीत कोणत्याही प्रकारचे वाईट वर्तन घडू नये, कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, यासाठी शासनाने १४ एप्रिल रोजी ‘ड्राय डे’ जाहीर करावा, अन्यथा जनसमुदायाकडून सर्व दारूविक्रीची दुकाने बंद करण्यात येतील. या घटनेला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला आहे.रॅलीत फारुखभाई पटणी, चंद्रकांत खंडाईत, नाना इंदलकर, सचिन वायदंडे, अक्षय कांबळे, शकील शेख, साईनाथ खंडागळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
१४ एप्रिलला ‘ड्राय डे’ जाहीर करा
By admin | Updated: April 6, 2016 00:24 IST