शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

फलटणकरांसाठी खुशखबर; निरा देवघर प्रकल्प व फलटण पंढरपूर रेल्वेमार्गाच्या कामांना मिळाली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 16:19 IST

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली याबाबत माहिती

फलटण : फलटण, खंडाळा,माळशिरस तालुक्याच्या सिंचन व पिण्याच्या पाण्याच्यादृष्टीने महत्वपुर्ण असणाऱ्या व गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या निरादेवघरच्या उर्वरित कामांना राज्य सरकारकडून ३९७६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता व फलटण पंढरपूर रेल्वेमार्गाच्या कामासाठी बाराशे कोटी रुपयांसह अन्य महत्वपुर्ण कामांना मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.माढा लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वारंवार पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज याप्रश्नी बैठक झाली. यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. मुंबई येथील मंत्रिमंडळ बैठक झाल्यावर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत खा रणजितसिंह यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, शहाजीराव पाटील, आ. राहुल कुल, जयकुमार शिंदे, धनंजय साळुंखे पाटील, विश्वासराव भोसले उपस्थित होतेरणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, निरा देवघर प्रकल्पाची लांबी २०८ किमी असून याच्या लाभ क्षेत्रात फलटण तालुक्यातील ५१ गावे येत असुन सिंचन १३५५० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. माळशिरस तालुक्यातील १६ गावे येत असुन १०९७० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने आंदोलने केली होती, व सदर आंदोलन आपण सुरु ठेवले होते. केंद्र व राज्य सरकारकडे याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता त्यास आज मुर्त स्वरुप प्राप्त होऊन मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली.फलटण तालुक्यातुन ब्रिटीश कालीन मंजुर असलेला व रखडलेल्या फलटण पंढरपूर या रेल्वे मार्गाच्या कामासाठी सुमारे बाराशे कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. हा रेल्वे प्रकल्प केंद्र व राज्य यांच्यात संयुक्त भागीदारीतुन होणार आहे. त्यासाठी राज्याच्या वाट्याच्या खर्चापैकी बाराशे कोटी रुपये रेल्वे मार्गासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुर करण्यात आले आहेत. याचबरोबर फलटण तालुक्यातील दुसरी नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहतीसही मान्यता देण्यात आली आहे. झिरपवाडी( ता. फलटण) येथील अनेक वर्ष बंदावस्थेत असलेल्या ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यास व फलटण शहरातील पन्नास खाटांचे असलेले उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटांचे करण्यासही मान्यता मिळाली आहे व यासाठी बासष्ट कोटीची तरतुद करण्यात आली आहे. माढा व फलटण येथे मंजुर झालेल्या सेशन कोर्टास इतर सुविधा व इमारत तरतुदीसाठी निधी मंजुर झाला आहे. फलटण तालुक्यासाठी १०० केव्हीए क्षमतेचे तीनशे नवीन विद्युत रोहित्र मंजुर करण्यात आली आहेत.पुणे जिल्ह्यातील निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पास ३९७६ कोटी ८३ लाख रुपयांच्या तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता. यामुळे  फलटण आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस अवर्षण प्रवण भागात १० हजार ९७० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहेकामांना मिळालेल्या मंजुरीची माहिती समजताच फलटण तालुक्यात भाजपच्या वतीने जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर