सांगळे यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST2021-07-20T04:26:46+5:302021-07-20T04:26:46+5:30
००००००००० बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड सातारा : सोनिपत (हरयाणा) येथील तिसऱ्या राष्ट्रीय युथ बॉक्सिंग स्पर्धेसाठी लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या रिषिका होले, ...

सांगळे यांची नियुक्ती
०००००००००
बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
सातारा : सोनिपत (हरयाणा) येथील तिसऱ्या राष्ट्रीय युथ बॉक्सिंग स्पर्धेसाठी लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या रिषिका होले, ओंकार गाढवे, हृषिकेश गिरीगोसावी यांची निवड झाली आहे. अकोला येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतील यशानंतर ही निवड झाली. त्यांना सागर जगताप, प्रा. विनायक भोई यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ, रवींद्र होले, हरिष शेट्टी, अमर मोकाशी, संजय पवार यांनी कौतुक केले.
०००००००
बामसेफचे अधिवेशन
सातारा : बामसेफने सातारा जिल्हा अधिवेशन रविवार, दि. १८ रोजी ऑनलाइन पद्धतीने आयोजित केले होते. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, अशी माहिती बामसेफ सातारा जिल्हा यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.
०००००००००
राष्ट्रीय एकलगान स्पर्धा
सातारा : भारत विकास परिषदेने राष्ट्रीय एकलगान स्पर्धा आयोजित केली आहे. कोरोनाचा शिरकाव असल्याने या स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. यासाठी हिंदी गाणे म्हणून त्याची चित्रफीत शाळेमार्फत पाठविण्याचे आवाहन केले आहे.