रमेश वैद्य यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST2021-01-08T06:05:40+5:302021-01-08T06:05:40+5:30
वाई : जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई येथील वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. रमेश वैद्य यांची विज्ञान विभागाच्या ...

रमेश वैद्य यांची नियुक्ती
वाई : जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई येथील वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. रमेश वैद्य यांची विज्ञान विभागाच्या उपप्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. वैद्य हे गेली अनेक वर्षे वनस्पतीशास्त्र या विषयाचे अध्यापन करीत आहेत. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ते सर्वश्रुत आहेत. महाविद्यालयाच्या अनेक कमिट्यांमधून त्यांनी उत्कृष्टपणे काम केले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल संस्थेचे माजी अध्यक्ष प्रतापरावजी भोसले, विद्यमान अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंतराव चौधरी, खजिनदार नारायण चौधरी, प्रभारी प्राचार्य डॉ. एकनाथ भालेराव, उपप्राचार्य विलास करडे, डॉ. भानुदास आगेडकर, कार्यालयीन प्रमुख रघुनाथ शेलार, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व सेवक यांनी कौतुक केले.
फोटो : ०५ रमेश वैद्य