शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करा, सातारा जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांची निदर्शने 

By नितीन काळेल | Updated: February 12, 2024 18:49 IST

सातारा : मागील तीन महिन्यांचे किमान वेतन अनुदान तातडीने बॅंक खात्यात जमा करावे, अभय यावलकर समिती अहवालानुसार वेतनश्रेणी लागू ...

सातारा : मागील तीन महिन्यांचे किमान वेतन अनुदान तातडीने बॅंक खात्यात जमा करावे, अभय यावलकर समिती अहवालानुसार वेतनश्रेणी लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.सातारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने आणि सरचिटणीस काॅ. शामराव चिंचणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेकडो ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.याबाबत जिल्हा परिषदेला निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. यामध्ये पंचायत राज कार्यालयाकडे अुनदानाबाबत जिल्ह्यातून पाठविलेल्या माहितीमध्ये त्रुटी आहेत. यापूर्वी कर्मचाऱ्यांना मिळालेल्या अनुदानापेक्षा कमी अनुदान जमा होत आहे. त्यामधील जाचक अटी रद्द करुन आणि प्राप्त माहितीचा फेरविचार करुन न्याय्य अनुदान देण्यात यावे. ग्रामविकास विभागाने किमान वेतनातील मागील १९ महिन्यांचे थकित अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार तातडीन अनुदान बॅंक खात्यात जमा करावे. भविष्य निर्वाह निधीत ८.३३ दरानुसार शासकीय अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित हिस्सा जमा करण्याचा आदेश ग्रामपंचायतींना द्यावा. किमान वेतनातील ग्रामपंचायतींना मागील थकित हिस्सा फरक अदा करण्याचे आदेश द्यावेत, प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत किमान वेतन अनुदान बॅंक खात्यात जमा करावे. दीपक म्हैसेकर समिती अहवालानुसार पेन्शन योजना लागू करावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशीही आमची मागणी आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतagitationआंदोलनzpजिल्हा परिषद