शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लाचप्रकरणी सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:44 IST

आज सुनावणी : सरकार पक्षाचे म्हणणे ऐकून घेणार

सातारा : जामीन अर्जाबाबत मदत आणि मंजूर करून देण्यासाठी पाच लाखांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग तीन धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तर याप्रकरणी न्यायाधीश निकम यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. यावर सरकार पक्षाचे म्हणणे ऐकण्यासाठी शुक्रवारी सुनावणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील माहिती आणि पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यानुसार याप्रकरणात पुणे येथील एका महिलेने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी, मुंबई), जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. तीन धनंजय लक्ष्मणराव निकम आणि अनोळखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे.तक्रारदार महिलेच्या वडिलांना सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात अटक झालेली आहे. त्यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. यासाठी संशयित एक आणि दोन यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश निकम यांच्यांशी संगनमत केले, तसेच जामीन अर्जाबाबत मदत करणे, जामीन मंजूर करून देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. तसेच लाचेची रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केल्याचेही निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांत तक्रार देण्यात आली होती.याप्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर न्यायाधीश धनंजय निकम यांच्या वतीने ॲड. ताहीर मणेर यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे, तर सरकारी वकील आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी जामीन अर्जावर शुक्रवारी पुढील सुनावणी ठेवली आहे, अशी माहिती ॲड. ताहीर मणेर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

अटक कोणालाही नाही..याप्रकरणात चाैघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पण, आतापर्यंत कोणालाही ताब्यात घेतलेले नाही, तसेच अटकही झालेली नाही, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली, तर या गुन्ह्याबाबत पुणे येथील ‘लाचलुचपत’चे पथक संपूर्ण लक्ष ठेवून आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCourtन्यायालयBribe Caseलाच प्रकरण