दुसऱ्या दिवशीही अर्ज माघार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST2021-06-05T04:27:55+5:302021-06-05T04:27:55+5:30
कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अर्ज दाखल करणे, छाननी या प्रक्रिया पूर्ण ...

दुसऱ्या दिवशीही अर्ज माघार नाही
कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अर्ज दाखल करणे, छाननी या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. सध्या अर्ज माघारीला सुरुवात झाली असली तरी, दुसऱ्या दिवशीही एकानेही माघार घेतलेली नाही.
रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील कृष्णा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार, रयत व संस्थापक या तीन पॅनेलच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय काही अपक्षांनीही उमेदवार अर्ज भरले आहेत. छाननीनंतर २१३ अर्ज पात्र ठरले आहेत. उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी गुरुवार, दि. १७ पर्यंत मुदत आहे. मात्र गेल्या दोन दिवसात एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही, अशी माहिती निवडणूक विभागामधून देण्यात आली.