खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप आवश्यक : शिवेंद्रसिंहराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:34 IST2021-04-05T04:34:54+5:302021-04-05T04:34:54+5:30
सातारा : ‘शिक्षणाबरोबरच विविध क्रीडा प्रकारांत पारंगत असणाऱ्या विध्यार्थ्यांना भविष्यात करिअरच्या चांगल्या संधी आहेत. खेळाडूंच्या चमकदार कामगिरीत सातत्य आवश्यक ...

खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप आवश्यक : शिवेंद्रसिंहराजे
सातारा : ‘शिक्षणाबरोबरच विविध क्रीडा प्रकारांत पारंगत असणाऱ्या विध्यार्थ्यांना भविष्यात करिअरच्या चांगल्या संधी आहेत. खेळाडूंच्या चमकदार कामगिरीत सातत्य आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणे आवश्यक आहे,’ असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
सातारा येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्रसमूह आणि निरंजन कदम मित्रसमूहाच्या वतीने गुणवंत खेळाडू गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘विविध क्रीडा प्रकारांत अनेक खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. तसेच खेळाडूंनीही कष्ट, जिद्द आणि चिकाटी वृत्ती अंगीकारून सरावामध्ये सातत्य ठेवले पाहिजे, तरच खेळाडू यशाचे शिखर गाठेल. निरंजन कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुणवंत खेळाडूंचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
या सोहळ्यात मधुरा ननावरे (कुस्ती), मृदुला पुरीगोसावी (जलतरण), आरव मोरे (मल्लखांब), आयुष मोकाशी (बॉक्सिंग), साईराज काटे (नेमबाजी), उमेश चव्हाण (शरीरसौष्ठव) आदी गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्रसमूहाचे अध्यक्ष फिरोज पठाण, उपाध्यक्ष निरंजन कदम, विलासपूरचे उपसरपंच अभय जगताप, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील, सचिन पाटील, जितेंद्र कदम, रोहन घोरपडे, धीरज डिसले, शंकर भोसले, ऋषिकेश जांभळे आदी उपस्थित होते.
फोटो ०३सातारा सुरूची नावाने...
फोटो ओळ : सातारा येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी निरंजन कदम उपस्थित होते.
\\\\\\\\\\\\\\\\\\\