शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचीही आता अ‍ॅन्टीजेन टेस्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:43 IST

शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर अनेक शिक्षक बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सावध पवित्रा घेत विद्यार्थ्यांचीही रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले आहे. मात्र, संबंधित शहर, जिल्ह्यातील परिस्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यानुसार अंमलबजावणी करावी, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचीही आता अ‍ॅन्टीजेन टेस्ट !जिल्ह्यात ३३ शिक्षकांसह शालेय कर्मचारी बाधित

सातारा : शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर अनेक शिक्षक बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सावध पवित्रा घेत विद्यार्थ्यांचीही रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले आहे. मात्र, संबंधित शहर, जिल्ह्यातील परिस्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यानुसार अंमलबजावणी करावी, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात शाळा सुरू होणार असल्याने शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत ६ हजार ७८४ शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांच्या टेस्ट घेण्यात आल्या आहेत. यामध्ये ३३ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्व विद्यार्थी घरीच आहेत. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्ट करणे गरजेचे आहे. असे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनही विद्यार्थ्यांच्या टेस्ट करण्याच्या विचारात आहे.पहिल्या टप्प्यात शिक्षकांच्या टेस्ट केल्या जाणार आहेत. जर गरज भासली तरच विद्यार्थ्यांच्या टेस्ट केल्या जातील, असे एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात एकूण शिक्षक आणि कर्मचारी संख्या दहा हजार आहे. या सर्वांची कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे. आरोग्य विभाग केल्या चार दिवसांपासून दिवसभर मेहनत घेत आहे. अद्याप कोरोनाची स्थिती सुधारली नसल्याने शाळेत येण्यापूर्वीच विद्यार्थ्यांची अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्याची मागणीही पालकांमधून होत आहे.शाळा सुरू झाली तर विद्यार्थ्यांना रिक्षाने शाळेत जावे लागणार आहे. या रिक्षाचे रोज निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे. त्यामुळे येणारा खर्च पालकांवर की स्वत: रिक्षाचालक करणार, यावर सध्या पालकांमध्ये खल सुरू आहे. कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे मुलांना शाळेत सोडायचे की नाही, यावर पालक संभ्रमात आहेत. काही पालकांनी अजून काही दिवस शाळा बंद ठेवल्या तरी चालेल, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केलीय.म्हणे टेस्ट गरजेची....कोरोना बाधितांमध्ये अलीकडे लहान मुलांचा समावेश नाही. वयस्कर लोकच बाधित आढळून येत आहेत. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्याही टेस्ट करणे गरजेचे असल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSatara areaसातारा परिसर