कऱ्हाड तालुक्यात ‘स्वाइन’चा आणखी रुग्ण

By Admin | Updated: March 3, 2015 22:45 IST2015-03-03T21:59:06+5:302015-03-03T22:45:19+5:30

खासगी रूग्णालयात उपचार : आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू

Another sufferer of Swine in Karhad taluka | कऱ्हाड तालुक्यात ‘स्वाइन’चा आणखी रुग्ण

कऱ्हाड तालुक्यात ‘स्वाइन’चा आणखी रुग्ण

कऱ्हाड : कोडोली ता. कऱ्हाड येथे ‘स्वाइन फ्लू’चा आणखी एक रूग्ण आढळून आला आहे. अविनाश जोतीराम मोरे (वय ४२) असे
रूग्णाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.कऱ्हाड तालुक्यातील कोडोली येथील अविनाश मोरे यांना काही दिवसांपासून सर्दी, खोकला व ताप आला होता. त्यामुळे उपचारार्थ त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाही अविनाश यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या आवश्यक त्या तपासण्या करण्यात आल्या.त्यावेळी त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. अविनाश यांच्यावर सह्णाद्री रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, शनिवारी टेंभू येथील सुनंदा भुसारी या महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच ‘स्वाईन फ्लू’चा आणखी एक रूग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. विभागातर्फे आवश्यक त्या उपाययोजना आखल्या जात आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Another sufferer of Swine in Karhad taluka