डबेवाडी खूनप्रकरणात आणखी एकाला अटक

By Admin | Updated: June 15, 2014 00:15 IST2014-06-15T00:08:22+5:302014-06-15T00:15:11+5:30

सातजणांना चार दिवस पोलीस कोठडी

Another person arrested in Dabewadi murder case | डबेवाडी खूनप्रकरणात आणखी एकाला अटक

डबेवाडी खूनप्रकरणात आणखी एकाला अटक

सातारा : येथील मंगळवार पेठेतील विकास पवार (वय २८) याचा खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी आज, शनिवारी आणखी एकाला अटक केली. सतीश विठ्ठल माने (वय ३४, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, शुक्रवारी अटक केलेल्या सात आरोपींना न्यायालयाने दि. १८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वरातीत नाचण्याच्या कारणावरून डबेवाडी, ता. सातारा येथे गुरुवारी रात्री झालेल्या सशस्त्र मारामारीत विकास प्रकाश पवार याचा खून झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय ऊर्फ पप्पू बबन पवार, सागर जयसिंग देवरे, प्रदीप नारायण देवरुखे, संग्राम चंद्रकांत माने, सागर दादासो माने, अभिजित बबन पवार, सागर कार्वे (सर्व रा. डबेवाडी, ता. सातारा) यांना अटक केली होती. या सर्वांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सतीश माने हा आज स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला. रात्री उशिरा आणखी एका रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडेही या खून प्रकरणाबाबत कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Another person arrested in Dabewadi murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.