बनावट नोटा टोळीतील आणखी एकास अटक
By Admin | Updated: December 2, 2014 00:26 IST2014-12-01T22:58:35+5:302014-12-02T00:26:08+5:30
एलसीबीची कारवाई : अठरा हजारांच्या नोटा जप्त

बनावट नोटा टोळीतील आणखी एकास अटक
सातारा : बनावट नोटा टोळीतील आणखी एका आरोपीस सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेने मोळाचा ओढा परिसरात ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून अठरा हजार रुपयांच्या बनावट नोट हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता सहा झाली आहे.
सोमवारी अटक केलेल्या आरोपीचे नाव परमेश्वर भानुदास कचरे (वय २७, रा. हेळंब, ता. देवणी, जि. लातूर) असे आहे. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींना शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे.
सातारा स्थानिक गुन्हे शाखेला शनिवारी सातारा येथे राधिका रस्त्यावर ४ ते ५ जण बनावट नोटा चालविण्यासाठी फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रणजित जितेंद्र बिश्वास (वय ३२, रा. कमछलबेरीया, जि, नदीया. पश्चिम बंगाल. सध्या रा. नेरे हिंजवडी, पुणे), खंडाप्पा बळीराम तुगावे (वय २९, रा. मंगळूर, ता. औसा, जि. लातूर. सध्या रा. नेरे दत्तवाडी, हिंजवडी पुणे), राहुल आण्णाराव सुरवसे (वय २४, रा. राणी अंकुलगा ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर. सध्या रा. नेरे दत्तवाडी पुणे), ज्ञानेश्वर भानुदास कसबे (वय २३, रा. हेळंब, ता. देवणी, जि. लातूर. सध्या रा. नेरे दत्तवाडी पुणे) आणि अनिकेत मनोहर सूर्यवंशी (वय १९, रा. हेळंब, जि. लातुर. सध्या रा. वडगावशेरी, पुणे) यांना ताब्यात घेऊन अटक केली होती. सोमवारी या प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)