जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:42 IST2021-01-16T04:42:20+5:302021-01-16T04:42:20+5:30

सातारा : जिल्ह्यात अधून-मधून कोरोनामुळे मृत्यू होत असून, गुरुवारी आणखी एकाचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या एक हजार ८०४ ...

Another died of corona in the district | जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू

सातारा : जिल्ह्यात अधून-मधून कोरोनामुळे मृत्यू होत असून, गुरुवारी आणखी एकाचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या एक हजार ८०४ वर पोहोचली आहे. तसेच नवे ५१ रुग्ण आढळून आले असून, बाधितांचा आकडा ५५ हजार ४४१ इतका झाला आहे.

जिल्ह्यात बुधवारी रात्री ५३ जणांचे अहवाल बाधित आले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये फरांदवाडी, ता. फलटण येथील ८४ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. जिल्ह्यातील पाटण, फलटण, खटाव, माण, कोरेगाव, खंडाळा आणि वाई या सात तालुक्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, ही संख्या आठ ते १५ अशी आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना मुक्तीचेही प्रमाण चांगले असून, २९ नागरिकांना गुरुवारी घरी सोडण्यात आले, तर आतापर्यंत ५२ हजार ८१५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच गुरुवारी नव्याने १०० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Web Title: Another died of corona in the district