जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही ३३ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:36 IST2021-04-19T04:36:58+5:302021-04-19T04:36:58+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड कहर सुरू असून, गत दिवसांपासून बळींचा आकडा तीसच्या वर जाऊ लागला आहे. गत चोवीत ...

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही ३३ जणांचा मृत्यू
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड कहर सुरू असून, गत दिवसांपासून बळींचा आकडा तीसच्या वर जाऊ लागला आहे. गत चोवीत तासांत नवे १ हजार ४३४ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये तब्बल ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे बळींची संख्या २ हजार ११४ वर पोहोचली असून, बाधितांचा आकडा ८१ हजार ७९६ इतका झाला आहे.
जिल्ह्यात विशेषत: एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत वेगाने वाढू लागली आहे. दीड हजारांच्या वर बाधितांचे आकडे जाऊ लागले आहेत, तर तीसहून अधिक जणांचा रोज मृत्यू होत आहे. ही जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. शनिवारी ३८ जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच रविवारी आणखी ३३ जणांचा कोरोनाने बळी घेतला. मृतांमध्ये कोलवडी, ता. कोरेगाव येथील ६८ वर्षीय महिला, वाठार स्टेशन, ता. कोरेगाव येथील ७२ वर्षीय पुरुष, केळघर, ता. जावळी येथील ७० वर्षीय महिला, आंबेघर, ता. जावळी येथील ६७ वर्षीय पुरुष, लोणंद, ता. खंडाळा येथील ६१ वर्षीय पुरुष, कांजूर भांडुप मुंबई येथील ६५ वर्षीय महिला, बुधवार पेठ फलटण येथील ६५ वर्षीय महिला, देगाव, ता. सातारा येथील ८५ वर्षीय महिला, लोणंद, ता. खंडाळा येथील ६५ वर्षीय पुरुष, जांभगाव निसराळे, ता. सातारा येथील ६४ वर्षीय पुरुष, कुंभारगाव, ता. पाटण येथील ६५ वर्षीय महिला, असवली, ता. खंडाळा येथील ७७ वर्षीय पुरुष, एकंबे, ता. कोरेगाव येथील ७६ वर्षीय महिला, पुसेगाव, ता. खटाव येथील ७९ वर्षीय पुरुष, पळशी, ता. कोरेगाव येथील ७० वर्षीय पुरुष, मोही, ता. माण येथील ६२ वर्षीय पुरुष, दाखणी, ता. माण येथील ७५ वर्षीय पुरुष, वाघजाईनगर, ता. वाई येथील ८५ वर्षीय महिला, पारखंडी, ता. वाई येथील ५८ वर्षीय महिला, पुणे येथील ८४ वर्षीय पुरुष, बावधन, ता. वाई येथील ८० वर्षीय पुरुष, धोरोशी, ता. पाटण येथील ६५ वर्षीय पुरुष, विसापूर, ता. खटाव येथील ६५ वर्षीय महिला, टाकेवाडी, ता. माण येथील ६५ वर्षीय महिला, आगाशिवनगर, ता. कऱ्हाड येथील ३७ वर्षीय पुरुष, खानापूर, ता. वाई येथील २७ वर्षीय पुरुष, खटाव येथील ८० वर्षीय पुरुष, वडूज, ता. खटाव येथील ६६ वर्षीय पुरुष, किन्हई, ता. सातारा येथील ६५ वर्षीय पुरुष, वडूज, ता. खटाव येथील ६६ वर्षीय महिला, महाबळेश्वर येथील ६० वर्षीय पुरुष , नांदलापूर, ता. कऱ्हाड येथील ८२ वर्षीय महिला, कऱ्हाड येथील ७६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
चाैकट : दिवसभरात ३४२ कोरोनामुक्त
जिल्ह्यात एकीकडे बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाणही वाढत आहे. रविवारी दिवसभरात ३४२ नागरिकांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत ६६ हजार ९४८ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.