शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पुसेगावच्या श्री सेवागिरी यात्रेचा आज ‘मानाच्या झेंडा’ मिरवणुकीने होणार प्रारंभ, रविवारी रथोत्सव सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:59 IST

पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री सेवागिरी महाराजांचा यंदाचा वार्षिक रथोत्सव सोहळा रविवारी (दि. २९) साजरा होणार ...

पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री सेवागिरी महाराजांचा यंदाचा वार्षिक रथोत्सव सोहळा रविवारी (दि. २९) साजरा होणार आहे. सलग अकरा दिवस चालणाऱ्या या यात्रेचा बुधवारी (दि. २५) सकाळी ९ वाजता ‘मानाच्या झेंडा’ मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे.श्री सेवागिरी महाराजांच्या ७७व्या पुण्यस्मरणानिमित्त सेवागिरी यात्रा दि. २२ डिसेंबर ते दि. ४ जानेवारीदरम्यान पुसेगाव येथे वार्षिक यात्रा प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याची माहिती मठाधिपती सुंदरगिरी महाराज व देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, माजी चेअरमन रणधीर जाधव व बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख व गौरव जाधव यांनी दिली.

यात्रेनिमित्त ११ दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मानाच्या झेंडा मिरवणुकीने यात्रेस प्रारंभ होत असून, बुधवार, दि. २५ व २६ रोजी श्री हनुमानगिरी हायस्कूलच्या मैदानावर अखिल भारतीय दिवसरात्र खुल्या शूटिंग व्हॉलिबॉल स्पर्धा होणार आहेत. शुक्रवारी (दि. २७) बैलगाडी शर्यती, तर शनिवारी (दि. २८) कै. नारायणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे.रविवारी (दि. २९) हा यात्रेचा मुख्य दिवस असून, या दिवशी सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका व प्रतिमेची फुलांनी व नोटांच्या माळांनी सजवलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दरम्यान, दि. २८ ते १ जानेवारी या कालावधीत ‘राज्यस्तरीय सेवागिरी कृषी प्रदर्शन’ भरवण्यात येणार आहे.दि. ३१ रोजी जिल्हास्तरीय खुला युवामहोत्सव आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २ रोजी श्वान प्रदर्शन आणि श्वान शर्यती होणार आहेत. दि. २ रोजी बक्षीस जनावरांच्या नोंदी, तर दि. ३ रोजी जातिवंत खिलार जनावरांची निवड करण्यात येणार आहे. शनिवार (दि. ४) बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. पुसेगाव यात्रेकरूंच्या व भाविकांसाठी सर्व सोयीसुविधा ट्रस्ट व ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त यांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर