जावलीतील वार्षिक बैल बाजार स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST2021-03-20T04:38:32+5:302021-03-20T04:38:32+5:30
कुडाळ : मेढा व आनेवाडी येथे दरवर्षी जनावरांचा वार्षिक बैल बाजार होळीपासून आयोजित केला जातो. यंदा कोरोना विषाणूच्या ...

जावलीतील वार्षिक बैल बाजार स्थगित
कुडाळ : मेढा व आनेवाडी येथे दरवर्षी जनावरांचा वार्षिक बैल बाजार होळीपासून आयोजित केला जातो. यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. अशातच राज्यात कोरोनाची संख्या पुन्हा वाढत आहे. यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार मोठ्या कार्यक्रमांना बंदी घातली आहे. याचा विचार करून मेढा व आनेवाडी येथील बैल बाजार स्थगित केला आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी दिली.
मेढा व आनेवाडी येथील वार्षिक बैल बाजारात सातारा जिल्ह्यासह पुणे, सोलापूर, रायगड तसेच कर्नाटक राज्यातून बैल घेऊन शेतकरी व व्यापारी खरेदी-विक्रीसाठी येत असतात. बैल बाजारात मोठ्या संख्येने शेतकरी व्यापारी जमा होण्याची शक्यता असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी पुढील आदेश होईपर्यंत वार्षिक बैल बाजार स्थगित करण्याबाबत आदेश दिले आहेत. यामुळे या बैल बाजारासाठी येणाऱ्या शेतकरी, व्यापारी व परिसरातील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समितीचे सचिव महेश देशमुख यांनी केले आहे.
यावेळी बाजार समितीचे संचालक चंद्रकांत तरडे-इनामदार, राम पवार, शांताराम पार्टे, बाळासाहेब ओंबळे, सुनील देशमुख, शिवाजी गोरे, दिलीप परामणे, राजेंद्र गोळे उपस्थित होते.