शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरे यांचे भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रत्यूत्तर 
2
अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का...
3
ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"तर मी स्वतःहून बाजूला होईल"; संतोष धुरींच्या भाजप प्रवेशानंतर देशपांडे म्हणाले, "मला अधिकार नाही"
5
रविवारी की सोमवारी, केव्हा सादर होणार देशाचा अर्थसंकल्प; तारखेवर शिक्कामोर्तब, जाणून घ्या
6
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानची झोप उडाली; युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेत ओतले कोट्यवधी रुपये!
7
"बापाच्या खांद्यावर मुलाची अंत्ययात्रा..."; वेदांताचे मालक ७५ टक्के संपत्ती समाजकार्यासाठी खर्च करणार
8
एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
9
आजचे राशीभविष्य : गुरुवार ८ जानेवारी २०२६; या तीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी, मान व प्रतिष्ठा वाढेल
10
भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
11
“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस
12
अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती? 
13
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभांना उमेदवारांची सर्वाधिक मागणी; सभा, रोड शोंचा कल्ला सुरू
14
काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका
15
घडामोडींना वेग, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा; आता अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक भाजपमध्ये येणार
16
विरोधी पक्षनेतेपद नाहीच, आता प्रतोदांचा मंत्रिपदाचा दर्जाही जाणार; सरकारची सदस्य संख्येची अट
17
डॉन अरुण गवळीच्या दोन्ही मुली करोडपती; प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या मालमत्तेची माहिती उघड
18
अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात; ६ बिनविरोध उमेदवारांप्रकरणी अहवाल सादर
19
भारत देणार सर्वांना धक्का; वृद्धिदर ७.४ टक्के राहणार, सरकारने जाहीर केली आकडेवारी
20
शिंदेसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला; वांद्रे येथे प्रचार करताना झाला जीवघेणा हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

99th Marathi Sahitya Sammelan: अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 14:31 IST

साहित्य संमेलनात मराठी भाषा, शिक्षण व सांस्कृतिक प्रश्नांवर १७ ठराव मंजूर

छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी, सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ९९ व्या अधिवेशनात ज्येष्ठ साहित्यिक व लोककलावंत अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा, यासह मराठी भाषा, शिक्षण, संस्कृती व मराठी भाषिकांच्या हक्कांशी संबंधित एकूण १७ ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रत्येक ठरावाचे उपस्थित साहित्य रसिकांनी टाळ्या वाजवून उत्स्फूर्त स्वागत केले.ठरावामध्ये हिंदी वा तिसरी भाषा सक्तीच्या प्रयत्नांना ठाम विरोध करत नरेंद्र जाधव समिती तत्काळ रद्द करावी आणि राज्यात कोणत्याही शाळेत हिंदी वा तिसरी भाषा सक्तीची होणार नाही, याचे शासनाने लेखी अभिवचन द्यावे. राज्यातील मराठी माध्यमाच्या सुमारे १४ हजार शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने थांबवावा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.राज्यातील सुमारे ४० हजार शाळांमध्ये शालेय ग्रंथपालांची पदे भरावीत व नवीन पदनिर्मिती करावी. तज्ज्ञ भाषा सल्लागार समितीने २०२२ मध्ये सादर केलेले ५६ पानी संपूर्ण मराठी भाषा धोरण तत्काळ जाहीर करावे, तसेच मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अपारंपरिक ‘आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठ’ स्थापन करावे.महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांचा प्रश्न तातडीने सोडवून तो भाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा, मराठीसाठी मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापन करावे. ज्येष्ठ साहित्यिक व लोककलावंत अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा, असे ठराव टाळ्यांच्या कडकडाटात मंजूर करण्यात आले. ठरावाचे वाचन सुनीताराजे पवार यांनी केले.

अभिजात मराठीचे लाभ केंद्राकडून मिळावेतमराठी विषय बारावीपर्यंत सक्तीचा करावा, अभिजात भाषेचे सर्व लाभ केंद्राकडून मिळवून घ्यावेत, मराठी अनुवाद अकादमी स्वायत्त स्वरूपात स्थापन करावी, गोवा व गुजरातमध्ये मराठीसाठी विशेष उपाययोजना कराव्यात, तसेच सयाजीराव गायकवाड यांचे स्मारक व विमानतळ नामकरणाचे ठरावही मंजूर करण्यात आले. हे सर्व ठराव मराठी भाषा, संस्कृती व मराठी माणसाच्या हक्कांसाठी महत्त्वाचे असल्याचे मत संमेलनात व्यक्त करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Demand for Bharat Ratna to Annabhau Sathe at Marathi Sahitya Sammelan

Web Summary : At the 99th Marathi Sahitya Sammelan, a resolution was passed demanding Bharat Ratna for Annabhau Sathe. Seventeen resolutions concerning Marathi language, education, and rights were unanimously approved, opposing Hindi imposition and advocating for Marathi schools and linguistic autonomy.