टोमॅटो, कोबी, फ्लाॅवर पिकात जनावरे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:33 IST2021-02-08T04:33:35+5:302021-02-08T04:33:35+5:30
आदर्की : फलटण पश्चिम भागात टोमॅटो, फ्लाॅवर, कोबी या भाजीपाल्याला गत महिन्यापासून कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो, ...

टोमॅटो, कोबी, फ्लाॅवर पिकात जनावरे !
आदर्की : फलटण पश्चिम भागात टोमॅटो, फ्लाॅवर, कोबी या भाजीपाल्याला गत महिन्यापासून कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो, कोबी, फ्लाॅवर पिकात जनावरे सोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
फलटण पश्चिम तालुक्यातील आदर्की परिसरात धोम-बलकवडीचे पाणी आल्याने ऊसशेतीबरोबर शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करत आहेत; परंतु गत महिन्यापासून टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, पावटा, मिरची, मेथी, चाकवत आदी भाज्यांना कवडीमोल भाव मिळत आहे. आदर्की परिसरात टोमॅटो, कोबी, फ्लॉवर ही पिके हमीभाव देणारी असल्याने वर्षभर कोणत्याही हंगामात त्यांची लागवड केली जाते. परंतु, यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरनंतर केलेल्या लागवडीतील पिकाचा दर कमी-जास्त होत होता. हवामानातील बदलामुळे भाजीपाला पिकावर कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून टोमॅटो, फ्लाॅवर, कोबी ही पिके जोमात आणली. परंतु, गत महिन्यापासून या पिकांना कसलाही दर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तोडणी, वाहतूक खर्च वजा जाता शेतकऱ्यांना हातात काहीच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकात जनावरे सोडली आहेत, तर ज्या शेतकऱ्यांनी ऊसात आंतरपीक घेतले आहे, ते ऊसातून ही पिके बाहेर आणून जनावरांना घालत आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाला आहे.
(कोट..)
चांगला दर मिळेल, या आशेवर टोमॅटोची लागवड केली. औषधे, काट्या, तारा यावर खर्च केला; पण टोमॅटो तोडणीवेळी किलोला दोन ते तीन रुपये दर मिळत असल्याने खर्च वजा जाता हातात काहीच राहात नाही. कष्ट फुकट जात असल्याने टोमॅटोच्या शेतात जनावरे सोडली.
- शिवाजी बिचकुले, आदर्की, ता. फलटण
06आदर्की
फोटो - फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात दराअभावी टोमॅटो पिकात जनावरे सोडली आहेत.