बाटलीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची प्राणीमित्रांमुळे सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST2021-02-05T09:16:50+5:302021-02-05T09:16:50+5:30
महाबळेश्वर : प्लास्टिकच्या बाटलीत तोंड अडकलेल्या एका भटक्या कुत्र्याची महाबळेश्वर येथील सह्याद्र्री प्रोटेक्टरच्या प्राणिमित्रांनी सुखरूप सुटका केली. याबाबत अधिक ...

बाटलीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची प्राणीमित्रांमुळे सुटका
महाबळेश्वर : प्लास्टिकच्या बाटलीत तोंड अडकलेल्या एका भटक्या कुत्र्याची महाबळेश्वर येथील सह्याद्र्री प्रोटेक्टरच्या प्राणिमित्रांनी सुखरूप सुटका केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर बसस्थानक परिसरात एका कुत्र्याचे तोंड प्लास्टिकच्या बाटलीत अडकल्याचे आगारप्रमुख नामदेव पतंगे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याची माहिती सह्याद्री प्रोटेक्टरच्या प्राणिमित्रांना दिली. प्राणीमित्र रोहित लोहार, अमित खोत, शुभम ढेबे, अजिंक्य सपकाळ, सौरभ झाडे, जय आखाडे, प्रथमेश जाधव यांनी तातडीने घटनस्थळी धाव घेतली.
बिथरलेल्या कुत्राला पकडण्याचे प्राणीमित्रांपुढे मोठे आव्हान होते. मात्र, मोठ्या शिताफीने प्राणिमित्रांनी या कुत्र्यास पकडले. त्यानंतर प्लास्टिकची बाटली ब्लेडच्या साह्याने कापून त्याचे तोंड बाहेर काढून त्याची सुखरूप सुटका केली.
फोटो : ०२ महाबळेश्वर
प्लास्टिकच्या बाटलील तोंड अडकलेल्या एका भटक्या कुत्र्याची महाबळेश्वर येथील प्राणिमित्रांची सुटका केली.