वाई येथे अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:13 IST2021-02-18T05:13:27+5:302021-02-18T05:13:27+5:30

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात अंगणवाडी सेविकांनी कसलीही तमा न बाळगता समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जाऊन प्रसार व प्रचार ...

Anganwadi workers protest at Wai | वाई येथे अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन

वाई येथे अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात अंगणवाडी सेविकांनी कसलीही तमा न बाळगता समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जाऊन प्रसार व प्रचार केला; परंतु अंगणवाडी सेविकांकडे कोणीही लक्ष दिले नाही, कसल्याही प्रकारचा भत्ता प्रशासनाने या सेविकांना दिला नाही. अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. कोणतेही शासन आले तरीही अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. आश्वासनाशिवाय त्यांच्या पदरी काहीही पडले नाही. त्यातच अंगणवाडी सेविका संघटनेमध्ये अनेक संघटना काम करीत असल्याने राज्यकर्ते त्याच बाबींचा फायदा घेत असल्याने अंगणवाडी सेविकांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेले आहेत. अंगणवाडी सेविका संघ, भारतीय मजदूर संघटना संयुक्तरीत्या संपूर्ण देशात जिल्हाधिकारी कार्यालय व पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्याचा इशारा शासनाला दिला होता. त्यानुसार वाई पंचायत समितीसमोर अंगणवाडी महिलांनी शासनाने विविध मागण्या मान्य कराव्यात म्हणून जोरदार आंदोलन करून घोषणाबाजी केली.

निवेदनात विविध मागण्या आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी, योग्य पद्धतीने मानधन मिळावे, अंगणवाडी सेविकांना सहायक शिक्षिका म्हणून मान्यता मिळावी, भविष्य निर्वाह निधी, पेंशन मिळावी, इतर शिक्षकांप्रमाणे अंगणवाडी सेविकांना वैयक्तिक व वैद्यकीय रजा मिळाव्यात, यांचा समावेश आहे. आंदोलन दोन तास पंचायत समितीच्या समोर सुरू होते.

यावेळी अंगणवाडी सेविका संघाच्या जिल्हा सरचिटणीस वनिता सावंत, नंदा सणस, कोमल जगताप, रोहिणी ढगे, शोभा शेंडे, वनिता वाडकर, स्मिता पानसे उपस्थित होत्या.

फोटो

१७वाई-अंगणवाडी

वाई पंचायत समितीसमोर बुधवारी विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी निदर्शने केली. (छाया : जावेद खान)

Web Title: Anganwadi workers protest at Wai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.