शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

..अन् माणचे पाणी खटावकडे वळविले, पोलिसांनी स्वाभिमानी कार्यकर्त्यांना  घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 17:27 IST

शेखर जाधव वडूज: कायम अन्याय सहन करावा लागत असल्याने खटाव तालुक्यातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गत महिन्याभरापासून ...

शेखर जाधववडूज: कायम अन्याय सहन करावा लागत असल्याने खटाव तालुक्यातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गत महिन्याभरापासून सुरू असलेल्या माण तालुक्याकडील तारळीच्या कँनालच्या प्रवाह बदलून खटाव तालुक्याकडे वळविला . संबंधित पंचवीस ते तीस जणांना वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेतकरी संघटनेच्या न्याय भूमिकेमुळे स्वाभिमानीने खटाव तालुक्याचा स्वाभिमान जोपासल्याच्या चर्चा परिसरात सुरू होत्या.खटाव तालुक्यातील पुर्व भागातील गावांची उन्हाळी आवर्तनाची मागणी आहे. मात्र तरी देखील राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरू असलेला श्रेयवाद आणि संबंधित अधिकाऱ्यांची टाळाटाळ याबाबत तहसिलदार कार्यालयाला येत्या सोमवारी (दि.८) घेराव घालण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर डाळमोडी हद्दीतील तारळी गेटवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाच तारीख ओलांडून गेली तरी अधिकारी पाणी सोडण्याची तयारी दाखवत नसल्याने संयमाचा बांध फुटल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक आंदोलन करत अखेर पाणी सोडले. खटाव तालुक्यातील डाळमोडी येथील तारळीचे माण व खटावसाठी गेट असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी हे गेट खटाव तालुक्याकडे वळविले. सुमारे तीन तास हे पाणी सुरू होते. वडूज पोलिसांनी शेतकरी संघटनेचा सुमारे तीस कार्यकर्ते ताब्यात घेऊन त्यांना वडूज पोलिस ठाण्यात ठेवले आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी