आनंदराव चव्हाण पतसंस्थेचा ११२ कोटींचा व्यवसाय : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:39 IST2021-04-08T04:39:49+5:302021-04-08T04:39:49+5:30

मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी ६४ कोटी ३६ लाख झाल्या असून, ४७ कोटी ९७ लाख ...

Anandrao Chavan Patsanstha's business worth Rs 112 crore: Patil | आनंदराव चव्हाण पतसंस्थेचा ११२ कोटींचा व्यवसाय : पाटील

आनंदराव चव्हाण पतसंस्थेचा ११२ कोटींचा व्यवसाय : पाटील

मार्च २०२१ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी ६४ कोटी ३६ लाख झाल्या असून, ४७ कोटी ९७ लाख कर्ज वितरण करण्यात आले आहे. संस्थेची १५ कोटी ३७ लाख गुंतवणूक असून, २ कोटी ३२ लाख संस्थेचे भागभांडवल आहे. ६ हजार ८६ सभासद व संस्थेच्या ११ शाखा आणि मुख्य कार्यालय आहे.

याबाबत माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले, संस्थेची आधुनिकीकरणाकडे वाटचाल सुरू असून, २६ वर्षांच्या कालावधीत संस्थेने जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सभासदांचे हित हेच संस्थेचे हित हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्थेची वाटचाल सुरू आहे. १९९४ साली ढेबेवाडीसारख्या ग्रामीण भागात हिंदुराव पाटील यांनी संस्थेची स्थापना करून परिसरातील लोकांना सावकारी विळख्यातून बाहेर काढले. गत वर्षापासून कोरोनाचे सावट असतानाही संस्थेने नेत्रदीपक प्रगती केली आहे. यामध्ये संस्थेचे संचालक, सल्लागार, कर्मचारी यांचे योगदान आहे. सभासद व ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने वेगवेगळ्या ठेव योजना राबविल्या आहेत. त्यामुळे लोकांचा संस्थेकडे वाढत चाललेला कल संस्थेच्या प्रगतीचे शिखर आहे. (वा. प्र.)

फोटो : ०७अभिजित पाटील

Web Title: Anandrao Chavan Patsanstha's business worth Rs 112 crore: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.