शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधून ‘आनंद’ गायब अन् पृथ्वी‘राज’ धोक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:00 IST

प्रमोद सुकरे । लोकमत न्यूज नेटवर्क कºहाड : कोणाला स्वप्नातही वाटणार नाही अशा प्रकारची घडामोड कºहाडमध्ये घडली. पक्षांतर्गत कुरबुरीमुळे ...

प्रमोद सुकरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : कोणाला स्वप्नातही वाटणार नाही अशा प्रकारची घडामोड कºहाडमध्ये घडली. पक्षांतर्गत कुरबुरीमुळे पृथ्वीराज चव्हाणांच्या मागे मिनी मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणारे आनंदराव पाटील अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले. काँग्रेसमधून आनंदराव पाटील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याने आता कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे राजकारण अडचणीत येण्याची शक्यता आहे.आनंदराव पाटील हे चव्हाण कुटुंबीयांचे निष्ठावंत पाईक म्हणून ओळखले जातात. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर आनंदरावांचा भाव चांगलाच वाढला होता. मिनी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. निष्ठेचे फळ म्हणून त्यांना विधान परिषदेचे आमदार होण्याची संधीही मिळाली. या सर्व बाबींचा आनंदराव पाटील यांना भविष्यातील वाट चोखाळताना विचार करावा लागणार आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना एका वेगळ््या रांगेत बसविले पण आता छोट्या मोठ्या मानापमान नाट्याने मागच्या दिवसांची आठवण न ठेवता पुढचा भविष्यकाळ अडचणीचा ठरू शकतो. ना घर का ना घाट का अशी अवस्था होऊ नये म्हणजे झाले.सातारा जिल्ह्यातही काँग्रेसची मोठी पडझड झाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी धक्का दिला. ते आता भाजपचे खासदार आहेत. तर माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनीही काही दिवसांपूर्वीच हातात कमळ घेतले आहे. आता पक्षातील पृथ्वीराज चव्हाण समर्थक असलेल्या काहींकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने आनंदराव पाटील व त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. त्यामुळे आनंदराव पाटील नवी वाट चोखाळतील, अशी चर्चा सुरू आहे.दरम्यान, सोमवारी आमदार आनंदराव पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी डॉ. अतुल भोसलेही उपस्थित होते. हा योगायोग होता, असे म्हणता येणार नाही. त्यातच त्यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. साहजिकच त्यामुळे पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. मात्र, आनंदराव पाटील कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन दिशा ठरविणार असल्याचे सांगताहेत.भोसलेंची खेळी फायद्याची की तोट्याची?आमदार आनंदराव पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेट घालून देऊन डॉ. अतुल भोसलेंनी मोठी खेळी केल्याचे त्यांचे समर्थक सांगतात; पण क्रिया आली की प्रतिक्रिया ही येतेच. याप्रमाणे भोसलेंची ही खेळी फायद्याची की तोट्याची, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.मनधरणीचे प्रयत्न...आमदार आनंदराव पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मंगळवारी दिवसभर पाटलांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती. त्यातच काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सतेज पाटील आदींनी भ्रमणध्वनीवरून आनंदराव पाटील यांच्याशी संपर्क करून पक्षांतर्गत वाद मिटवू, असे सांगून मनधरणीचे प्रयत्न सुरू केल्याचे निकटवर्तीय सांगतात.मनोहारी मार्ग सुकर होईल...माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटाने एकत्र येण्याची गरज काही कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. मात्र, त्यात आमदार आनंदराव पाटील काहींना अडसर वाटत होते. आनंदराव पाटलांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तर पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या मनोमिलनाचा ‘मनोहारी’ मार्ग सुकर होईल, अशीही चर्चा सुरू झाली आहे.