शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

आॅनलाईनचा घोळ, अभियोग्यता चाचणीसाठी परीक्षार्थींची कसरत, सातारा जिल्ह्याबाहेर केंद्र मिळत असल्याने हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 11:59 IST

खासगी शाळांमधील शिक्षण सेवक भरतीसाठी होऊ घातलेल्या अभियोग्यता व बुद्धिमता चाचणीसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी परीक्षार्थींना कसरत करावी लागत आहे. राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची निवड गुणवत्तेच्या आधारे अधिक पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी शिक्षण परिषदेच्या वतीने दि. १२ ते २१ दरम्यान आॅनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत.

ठळक मुद्देशिक्षण परिषदेच्या वतीने आॅनलाईन परीक्षा अभियोग्यता व बुद्धिमता चाचणीसाठी राज्यातील ६७ केंद्रांवर परीक्षा केंद्र

पिंपोडे बुद्रुक : खासगी शाळांमधील शिक्षण सेवक भरतीसाठी होऊ घातलेल्या अभियोग्यता व बुद्धिमता चाचणीसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी परीक्षार्थींना कसरत करावी लागत आहे.राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची निवड गुणवत्तेच्या आधारे अधिक पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी शिक्षण परिषदेच्या वतीने दि. २१ डिसेंबर दरम्यान आॅनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत.

राज्यातील सुमारे ६७ केंद्रांवर संगणकाच्या उपलब्धतेनुसार दिवसभरात सकाळी नऊ ते अकरा, दुपारी साडेबारा ते अडीच व चार ते सहा अशा तीन सत्रांत परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा प्रवेश अर्जावेळी परीक्षार्थींनी प्राधान्यक्रम दिलेल्या परीक्षा केंद्रानुसारतच परीक्षा केंद्रे दिले गेले आहे.

तरीही बहुतांशी परीक्षार्थींना दुसरा, तिसरा प्राधान्यक्रम असलेली सातारा जिल्ह्याबाहेरील केंद्र मिळत आहेत. त्यामुळे दुर्गम, ग्रामीण भागातील परीक्षार्थिंना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

परीक्षेचे पहिले सत्र सकाळी नऊ वाजता सुरू होते. त्यामुळे परीक्षार्थींना जिल्ह्याबाहेरील केंद्रावर पोहोचणे अशक्य झाले आहे. याउलट परीक्षेचे शेवटचे सत्र सहा वाजता संपत असल्याने परीक्षा केंद्र्रावरून घरी जाणाऱ्या परीक्षार्थींना वाहतुकीच्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकSatara areaसातारा परिसर