शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण भारतात आढळला शिवछत्रपतींचा ऐतिहासिक ठेवा!, साताऱ्यातील इतिहास अभ्यासकांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 18:35 IST

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धार्मिक कार्याचा दाखला देणारा शिलालेख तामिळनाडूतील भूमीत प्रकाशात आला आहे. विल्लूपुरम जिल्ह्यातील तिरुवामत्तुर ...

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धार्मिक कार्याचा दाखला देणारा शिलालेख तामिळनाडूतील भूमीत प्रकाशात आला आहे. विल्लूपुरम जिल्ह्यातील तिरुवामत्तुर या गावातील अभिरामेश्वर मंदिराचा शिवछत्रपतींनी जीर्णोद्धार केल्याची नोंद या शिलालेखात आढळते. शिवरायांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत तामिळनाडूतील जिंजीचा बलाढ्य किल्ला जिंकला. यानंतर जिंजीच्या दक्षिणेला असलेल्या तिरुवाडी याठिकाणी मराठे आणि शेरखान लोधी यांची लढाई झाली. तिरुवामात्तुर हे गाव याच मार्गावर येत असून, येथे बंद असलेल्या शिव मंदिरात हा शिलालेख आढळला आहे. हा शिलालेख ओवीबद्ध असून, छत्रपती शब्दाचा स्पष्ट उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. पंपा नदीकिनारी असलेल्या अभिरामेश्वर मंदिराच्या पहिल्या सभामंडपात शिलालेखाचे दोन तुकडे बसविण्यात आले आहेत. एकाच शिळेचे हे दोन तुकडे असून, एकूण ११ ओळींचा शिलालेख आहे. हा कोरीव शिलालेख देवनागरी लिपी व मराठी भाषेत आहे. या कार्यात तामिळनाडू येथील प्रो. डॉ. रमेश, अथर्व पिंगळे यांचे सहकार्य मिळाले. दक्षिण दिग्विजयाचे इतिहास अभ्यासक अनिकेत वाघ, कुमार गुरव, शिलालेख अभ्यासक अनिल दुधाने, सौरभ जाधव यांनी या शिलालेखाचे संशोधन केले असून, लिप्यांतर अनिल दुधाने आणि वाचन के. एन. दीक्षित यांनी केले आहे.शिलालेख काय सांगतोपंबा नदीच्या किनारी जिथे वन्नि वृक्षाचे (औषधी वनस्पती) जंगल आहे, अशा तिरुवामत्तुर गावामध्ये अभिरामेश्वर मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कदाचित दक्षिण दिग्विजय मोहिमेत असताना या मंदिराचा जीर्णोद्धार केला व या मंदिरातील प्रमुख मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना केली व मोठा उत्सव सुरू केला.

दक्षिण भारतामध्ये मराठ्यांचा इतिहास सोनेरी अक्षरात लिहिला गेला आहे. साजरा किल्ल्यावरील महाराजांचे शिल्प आणि मराठी शिलालेख प्रथम उजेडात आला. त्यानंतर छत्रपतींचा उल्लेख असणाऱ्या शिलालेखाचे संशोधन ही मोठी उपलब्धी आहे. - कुमार गुरवछत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये कावेरी नदीपर्यंतचा प्रदेश हस्तगत केला. तिरुवामत्तुर गावामध्ये बंद असलेले शिव मंदिर पुन्हा सुरू करून महाराजांनी तिथे मोठा उत्सव सुरू केला. तमिळ भूमीत महाराजांचे नाव सुवर्णाक्षरात कोरले गेले आहे. - अनिकेत वाघ

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजTamilnaduतामिळनाडूhistoryइतिहास