शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न, साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 13:43 IST

सासरच्या चौघाजणांविरूद्ध गुन्हा दाखल

फलटण : लग्नामध्ये राहिलेले १० तोळे सोन्याचे दागिने दिले नाही, या कारणावरून मुंजवडी, ता. फलटण येथील विवाहितेला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती, नणंद, सासू आणि सासऱ्याविरूद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, लग्नामध्ये राहिलेले १० तोळे सोन्याचे दागिने दिले नाही तसेच शेतातील आणि घरातील कामे करीत नाही, या कारणावरून तेजस्विनी सूर्यकांत गुजले (वय २४, रा. मुंजवडी, ता. फलटण) यांना पती सूर्यकांत विलास गुजले, सासू राधाबाई विलास गुजले आणि सासरे विलास गुलाब गुजले (रा. मुंजवडी) आणि नणंद हिराबाई उर्फ साधना शिवाजी उर्फ लखन चव्हाण (रा. चंद्रपुरी, ता. माळसिरस, जि. सोलापूर) हे संगनमत करून सतत शिविगाळ, दमदाटी करून शारीरिक व मानसिक त्रास देत होते. दि. २२ रोजी सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास पती सूर्यकांत आणि सासरे विलास यांनी तेजस्विनी हिचे दोन्ही हात पकडून खाली पाडले आणि सासू राधाबाई व नणंद हिराबाई हिने तेजस्विनी यांचे तोंड जबरदस्तीने उघडून विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा करून कशीतरी तेजस्विनी यांनी आपली सुटका करून पोलिस ठाणे गाठले आणि वरील चौघांजणाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस नाईक काकडे करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी