अमेय निकम याचे शूटिंग स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:39 IST2021-03-17T04:39:44+5:302021-03-17T04:39:44+5:30
या स्पर्धेत ज्युनिअर वुमन गटात तनिष्का खुटवड हिने सुवर्णपदक प्राप्त केले. त्याचप्रमाणे रणवीर खुटवड, इंद्रजित खुटवड व अथर्व काळे ...

अमेय निकम याचे शूटिंग स्पर्धेत यश
या स्पर्धेत ज्युनिअर वुमन गटात तनिष्का खुटवड हिने सुवर्णपदक प्राप्त केले. त्याचप्रमाणे रणवीर खुटवड, इंद्रजित खुटवड व अथर्व काळे यांनीही यश संपादन केले. या सर्व खेळाडूंचीही दिल्ली येथील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यांना प्रिसाईज शूटिंग क्लबच्या हेमंत बालवडकर यांनी प्रशिक्षण दिले. त्यांच्या या यशाबद्दल सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय निकम (बापू), अपशिंगे (मि.) च्या सरपंच सारिका गायकवाड, उपसरपंच उमेश निकम, माजी उपसरपंच दीपक नलगे, धनजंय निकम (राजू), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके तसेच ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले.