तांबवेच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST2021-02-05T09:12:48+5:302021-02-05T09:12:48+5:30
तांबवे, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र ...

तांबवेच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध
तांबवे, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, कोयना बँकेचे संचालक अविनाश पाटील, सतीश पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश पाटील, बाळासाहेब शिंदे, सुनील पाटील, अनिल पाटील, नवनिर्वाचित सदस्य शोभाताई शिंदे, स्वाती काटवटे, जयश्री कबाडे, रेश्मा वाडते, नीता पवार, अॅड. विजयसिंह पाटील, देवानंद राऊत, उत्तम साठे आदी उपस्थित होते.
तांबवे येथे भैरवनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून तेरापैकी आठ जागा जिंकून विजय संपादन करीत सत्तांतर करण्यात यश आले होते. नवनिर्वाचित सदस्यांनी पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण, रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.
अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या विचारांचे असणारे तांबवे हे गाव आहे. या गावाने नेहमीच उंडाळकरांची पाठराखण केली. यापुढील काळातही त्यांच्या विचारांची जोपासना केली जाईल. तसेच गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर असणार आहे. गावाच्या विकासासाठी मतभेद विसरून सामान्य जनतेच्या हिताची कामे सदस्यांनी करावीत.