शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

साताऱ्यातील कास पठारावर यंदा फुलांबरोबरच पर्यटकांचाही बहर!, दीड कोटींचा महसूल जमा

By दीपक शिंदे | Updated: October 30, 2023 14:22 IST

ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने पर्यटकांना प्रवेश देण्यात आला

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावर यंदा निसर्गकृपा चांगली झाल्याने गतवर्षीपेक्षा जास्त फुले उमलली. यामुळे पर्यटकांची संख्याही दुप्पट झाली. यामुळे कासवर यंदा फुलांबरोबरच पर्यटकांचाही चांगला बहर आल्याचे पाहावयास मिळाले. पर्यटकांकडून दीड कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.यावर्षी तीन सप्टेंबरला अधिकृत हंगाम सुरू झाला. ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने पर्यटकांना प्रवेश देण्यात आला. यावर्षी सप्टेंबरनंतरच फुले चांगली बहरल्याने ऑनलाईनची तीन हजार तिकीट विकेंडला क्षणात संपत होती. तिकीट न मिळाल्याने अनेकजण थेट येत असल्याने शनिवार, रविवारी प्रचंड गर्दी होऊन वाहतूक कोंडीही झाली होती. यावर्षी पठारावरील कुंपण हटवल्याने पठारावर वेगवेगळ्या प्रजाती चांगल्या प्रकारे बहरल्याचे दिसून आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात येणारी गेंद, तेरडा, सीतेची आसवे, सोनकी, मिकीमाऊस, चवर यांचे गालिचे पाहावयास मिळाले. टोपली कारवीही यावर्षी बहरल्याचे पाहावयास मिळाले. अनेक दुर्मीळ प्रदेशनिष्ठ फुले कासवर येतात. यावर्षी यातील किटकभक्षी, ड्राॅसेरा इंडिका, बर्मानी, कंदीलपुष्प, आभाळी, नभाळी, आमरी, सातारेन्सीस, टूथब्रश अशी फुलेही चांगली होती. गतवर्षी पन्नास हजारांच्या आसपास पर्यटकांनी कासला भेट दिली होती. यातून सुमारे ७५ लाखांचा महसूल जमा झाला होता. पण, यावर्षी पर्यटकांची संख्या दुप्पट होण्याबरोबरच महसूलही दीड कोटींच्या पुढे गेला.केवळ सव्वा महिने हंगामहंगाम तीन सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर या कालावधीत फक्त सव्वा महिनेच चालला. यामध्ये शनिवार, रविवारी प्रचंड गर्दी होऊन अनेकांची गैरसोय झाली. ऑक्टोबरमध्ये पावसाने ओढ दिल्याने फुलांनी लवकर निरोप घेतला. दोन महिने चालणारा हंगाम सव्वा महिनेच चालल्याने शेवटच्या टप्प्यात येणाऱ्यांची निराशा तर अनेकांना हंगाम संपल्याने येता आले नाही. स्थानिक व्यावसायिकांना हंगाम कालावधी कमी झाल्याने नुकसान सहन करावे लागले.

कासचा हंगाम चांगला गेला असून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. वनविभागाशी चर्चा करून कासचे पर्यटन बारमाही होण्यासाठी परिसरातील नैसर्गिक स्थळांची पाहणी करून नवीन पाॅइंट विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहू. - सोमनाथ जाधव, माजी अध्यक्ष, कास समिती

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारtourismपर्यटन