ग्रामविकासाबरोबर पर्यावरणालाही चालना देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:42 IST2021-09-06T04:42:58+5:302021-09-06T04:42:58+5:30

वरकुटे-मलवडी : ‘कुकुडवाड गटात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावात विकासाची गंगा पोहोचवणार असून, खेडोपाड्यात वाडी-वस्त्यांवर किशोरवयीन मुलांना सोयीस्कर शिक्षणासाठी जिल्हा ...

Along with rural development, it will also boost the environment | ग्रामविकासाबरोबर पर्यावरणालाही चालना देणार

ग्रामविकासाबरोबर पर्यावरणालाही चालना देणार

वरकुटे-मलवडी : ‘कुकुडवाड गटात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावात विकासाची गंगा पोहोचवणार असून, खेडोपाड्यात वाडी-वस्त्यांवर किशोरवयीन मुलांना सोयीस्कर शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत सुसज्ज वर्गखोल्यांची सुविधा उपलब्ध करून, त्यासोबतच पर्यावरणासाठी वृक्षारोपणाला चालना देणार आहे’, असे मत कुकुडवाड गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा देसाई यांनी व्यक्त केले.

वरकुटे-मलवडी येथील खरातवाडी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्गखोल्यांच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच बाळकृष्ण जगताप, विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, उपसरपंच कमीर इनामदार, माजी सरपंच भारत अनुसे, जालिंदर खरात, जयसिंग नरळे, विलास खरात, रामचंद्र थोरात, दिलीप खरात, आर. वाय. खरात, ऋषिकेश जगताप, तानाजी बनगर, बापूराव बनगर, साहेबराव खरात, परीक्षेत पिसे, बाजीराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

देसाई म्हणाल्या, ‘खेडोपाड्यातील गोरगरीब मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी शाळेच्या वर्गखोल्या सुसज्ज असायला हव्यात. त्याचबरोबर वृक्षारोपणामुळे परिसर हिरवागार होऊन, पर्यावरणपूरक वातावरण तयार होण्यास मदत होईल.’ यावेळी खरातवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या आधुनिक शिक्षणासाठी संगणक भेट देण्यात आला. खरातवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सुजान बनसोडे याची सैनिक स्कूल, सातारासाठी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सिद्धार्थ बनसोडे, चंद्रकांत जाधव, शोभा बनसोडे, दीपाली राऊत यांच्यासह वरकुटे-मलवडी येथील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

Web Title: Along with rural development, it will also boost the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.