शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

निगेटीव्ह रक्त उपलब्धतेची पॉझिटीव्ह कहाणी!, सातारकरांची एकजुटी

By प्रगती पाटील | Updated: November 30, 2023 19:24 IST

शासकीय पातळीवर तुटवडा; समाज माध्यमातून जुळवाजुळव

सातारा : सिझेरियन पध्दतीने बाळंतपण झाल्यानंतर तासाभराने महिलेला अतिरक्तस्त्राव होऊ लागला. शरिरातून रक्तस्त्राव झाल्याने महिलेची प्रकृती खालवली. ओ निगेटीव्ह या रक्ताचा जिल्ह्यातील सर्वच रक्त पेढ्यांमध्ये तुटवडा होता. समाजमाध्यमावर याविषयीची माहिती व्हायरल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच रक्तदाते उपलब्ध झाले. त्यांनी रक्तदान केल्यामुळे या महिलेचे पुढील उपचार सुरू झाले. महिलेवर उपचार करण्यासाठी अद्यापही काही दात्यांनी रक्तदान करण्याची गरज आहे.कोरेगाव तालुक्यातील बिचुकले या गावातील २७ वर्षीय महिला सिझेरियन पध्दतीने बाळंत झाली. रक्तस्त्राव झाल्यामुळे तिला ओ निगेटीव्ह रक्तगटाची गरज भासली. जिल्ह्यातील सर्वच रक्तपेढ्यांमध्ये हे रक्त उपलब्ध नसल्यामुळे बिचुकले गावचे सरपंच प्रशांत पवार यांनी सोशल मिडियाचा आधार घेत रक्तदात्यांनी शोधण्याचे आवाहन करणारी पोस्ट टाकली. बघता बघता ही पोस्ट अनेकांच्या स्टेटसवर झळकु लागली. तातडीने उद्योजक कन्हैय्यालाल राजपुरोहित, रेणू येळगावकर, तेजस्विनी जाधव या ओ निगेटिव्ह रक्तगट असलेल्यांनी तातडीने जाऊन रक्तदान केले. त्यांनी केलेल्या रक्तदानामुळे महिलेवरील उपचार सुरू झाले.

साठा आवश्यकजिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये सर्वच रक्तगटाचे रक्त उपलब्ध असणे आवश्यक आहे. विशिष्ट रक्तदगट दुर्मिळ असल्याची माहिती असलेल्या शासकीय यंत्रणांनी या रक्तगटांचे रक्ताचा किमान साठा स्वत:कडे ठेवणे अपेक्षित आहे. ओ निगेटीव्ह रक्त केवळ जिल्हा शासकीय रूग्णालयातच उपलब्ध होते. पण तेही गर्भवती महिलेसाठी राखीव ठेवल्याचे सांगण्यात आले. रक्तगट दुर्मिळ असेल तर त्याचे दाते शाेधून त्यांना रक्तदान करण्यास प्रवृत्त करण्याची भूमिका यंत्रणांनी घेणे आवश्यक आहे.

यांनी संकटकाळी करावे रक्तदानबी निगेटिव्ह हे रक्त गट असणारे लोक एकुण लोकसंख्येच्या अवघ्या दीड टक्के आहेत. एबी निगेटिव्हचे लोक एकूण लोकसंख्येच्या ०.६ टक्के आहेत. तर एबी पॉझिटिव्ह रक्तगटाचे लोक ३.४ टक्के आहेत. त्यामुळे बी निगेटिव्ह, एबी निगेटिव्ह, एबी पोझिटिव्ह हे रक्तगट असलेल्या लोकांनी शिबिरांमध्ये रक्तदान करण्यापेक्षा गरजेच्यावेळी रक्तदान करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे.

ओ निगेटिव्हचा तुटवडा यासाठी!ओ निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हा रक्तगट दुर्मिळ नाही. या रक्तगटाला युनिर्व्हसल डोनर असे संबोधले जाते. याचे कारण म्हणजे ओ निगेटिव्ह रक्तगट असलेल्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटांना चालु शकते. या उलट ओ निगेटिव्ह असलेल्या व्यक्तिला ओ निगेटिव्ह रक्तच लागते, त्यामुळे याचा तुटवडा कायम भासतो. एबी पाॅझिटीव्ह असा रक्तगट आहे ज्याला सगळ्यांचे रक्त चालु शकते. मात्र, देताना तो फक्त एबी पाॅझिटीव्ह असलेल्याच रक्तदान करू शकतो.

कोणतीही शस्त्रक्रिया करताना रूग्णाचा रक्तगट असलेले रक्त राखीव ठेवायला सांगितले जाते. गर्भवती महिलांच्या बाबत इर्मजन्सीची परिस्थिती निर्माण झाली तर एेनवेळी रक्त शोधण्याची धावपळ करावी लागते. यासाठी दुर्मिळ आणि निगेटीव्ह रक्तगट असणाऱ्यांनी आपल्या फोनच्या यादीत स्वत:च्या रक्तगटातील व्यक्तींचेही नंबर ठेवणे आवश्यक आहे. - डाॅ. सुरेश शिंदे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBlood Bankरक्तपेढीSocial Mediaसोशल मीडिया