शिवप्रसाद ड्रेसेसमध्ये सर्व शाळांचे गणवेश उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:28+5:302021-02-05T09:17:28+5:30

वाई : येथे गेली ५० वर्षे शालेय गणवेशासाठी वाईतील प्रसिध्द भव्य दालन शिवप्रसाद ड्रेसेसची परंपरा असून, अजित वनारसे यांनी ...

All school uniforms available in Shivprasad dresses | शिवप्रसाद ड्रेसेसमध्ये सर्व शाळांचे गणवेश उपलब्ध

शिवप्रसाद ड्रेसेसमध्ये सर्व शाळांचे गणवेश उपलब्ध

वाई : येथे गेली ५० वर्षे शालेय गणवेशासाठी वाईतील प्रसिध्द भव्य दालन शिवप्रसाद ड्रेसेसची परंपरा असून, अजित वनारसे यांनी कापडाचा उत्तम दर्जा व उत्तम प्रतीची शिलाई हाच ध्यास घेऊन विविध शाळांच्या गणवेशांचे उत्पादन बचत गटाच्या माध्यमातून सुरू केल्याने शेकडो महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला.

कापडाचा व शिलाईचा उत्तम दर्जा पाहून व्यवसायात दिवसेंदिवस वृद्धी होऊ लागली; परंतु दर्जा राखण्यासाठी कोणतीही तडजोड न करता सचोटीने व्यवसाय करत गेल्याने थोड्याच काळात शिवप्रसाद ड्रेसेस हे एक विश्‍वसनीय नाव वाई शहरात नावारूपास आले. येथे मार्गदर्शक तत्त्वांनुसार इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शासकीय, खासगी शाळांचे गणवेश उपलब्ध आहेत. वाई, महाबळेश्‍वर, पाचगणी, मेढा येथील हायस्कूल व प्राथमिक शाळांना आपण मफतलाल मिल्सचे दर्जेदार कापड वापरून गणवेश पुरवठा करत असल्याची माहिती अमित वनारसे यांनी दिली. जिल्हा परिषद शाळांना माफक दरात उच्च पद्धतीच्या गणवेशाचा पुरवठा व अत्यंत उच्च दर्जाच्या शिलाईमध्ये पुरवठा केला जातो. हे गणवेश अमितच्या पत्नी नगरसेविका रूपाली वनारसे यांच्या रुक्मिणी महिला बचत गटाच्या माध्यमातून शिवून घेतले जातात. उत्तम महिला बचत गट म्हणून शासन स्तरावर त्यांच्या गटाचे कौतुक होत आहे. ग्राहकांना सोयीसाठी येथे अजून एक शिवप्रसाद ड्रेसेसचे भव्य दालन सुरू केले आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक जिल्हा परिषद शाळांसाठी वेगवेगळे पॅटर्न उपलब्ध असलेले एकमेव ठिकाण म्हणजे शिवप्रसाद ड्रेसेस वाई, अशी माहिती अमित अजित वनारसे यांनी दिली. (वा.प्र.)

०३ शिवप्रसाद

Web Title: All school uniforms available in Shivprasad dresses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.