रामवाडीत सर्व रोग निदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST2021-03-20T04:38:56+5:302021-03-20T04:38:56+5:30
पाचगणी : कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र वालुथ यांच्या संयुक्त विद्यमाने रामवाडी, ता. जावळी येथे सर्वरोग निदान शिबिर ...

रामवाडीत सर्व रोग निदान शिबिर
पाचगणी : कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र वालुथ यांच्या संयुक्त विद्यमाने रामवाडी, ता. जावळी येथे सर्वरोग निदान शिबिर झाले. यामध्ये ४१ रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
रामवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र वालुथ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिर आयोजित केले होते. हे शिबिर कुडाळ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनंत वेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. वेदांतीराजे भोसले यांनी रुग्णतपासणी केली. त्यांच्यासोबत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक सुभाष फरांदे, आरोग्य सेविका मंगल देशमुख, मोनिका येळे, शालिनी देशमुख, आशा स्वयंसेविका प्रीती कदम यांनी सहकार्य केले.
शिबिरात गावातील ४१ रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यामध्ये मधुमेह, रक्तदाब, दमा, कर्करोग, थायरॉईड, क्षयरोग आदी तपासण्या केल्या गेल्या, तर इतर आजारांच्या सुद्धा तपासण्या करण्यात आल्या. यास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.