शिरवळ येथे भरदिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:40 IST2021-01-23T04:40:57+5:302021-01-23T04:40:57+5:30
शिरवळ : शिरवळ येथील एका इमारतीमधील बंद घराची कडी काढून चोरट्यांनी १० तोळे सोन्यांच्या दागिन्यांसह १ लाख ७० हजार ...

शिरवळ येथे भरदिवसा घरफोडी
शिरवळ : शिरवळ येथील एका इमारतीमधील बंद घराची कडी काढून चोरट्यांनी १० तोळे सोन्यांच्या दागिन्यांसह १ लाख ७० हजार रुपयांची रोकड असा ४ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरीसाठी चोरट्यांनी कारचा वापर केला आहे. संबंधित चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेने शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील महामार्गालगत एका इमारतीमध्ये अशोक उत्तमराव गाजरे हे कुटुंबीयांसमवेत राहण्याकरिता आहे. अशोक गाजरे हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असता त्यांचा मुलगा हा घरात कडी लावून दुकानांमध्ये गेला होता. यावेळी चोरट्यांनी घरामध्ये कडी काढत घरामध्ये प्रवेश करीत कपाटामधील १ लाख ५० हजार रुपये किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, ४५ हजार रुपये किमतीची दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, १८ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या तीन ग्रॅम वजनाच्या अंगठ्या, ४५ हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे झुमके व वेल तसेच १ लाख ७० हजार रुपयांची रोकड असा ४ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे.
दरम्यान, चोरीच्या घटनेची माहिती मिळताच तातडीने फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, शिरवळ पोलीस निरीक्षक उमेश हजारे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, वृषाली देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तपासकामी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहे.
या घटनेची फिर्याद शिरवळ पोलीस स्टेशनला अशोक गाजरे यांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे तपास करीत आहे.