कऱ्हाडच्या फार्मसी कॉलेजचा अक्षय शिंदे देशात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST2021-03-24T04:37:10+5:302021-03-24T04:37:10+5:30
जीपीएटी परीक्षेत महाविद्यालयातील एकूण ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद दिल्ली व नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्यावतीने एमफार्मसीच्या ...

कऱ्हाडच्या फार्मसी कॉलेजचा अक्षय शिंदे देशात प्रथम
जीपीएटी परीक्षेत महाविद्यालयातील एकूण ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद दिल्ली व नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्यावतीने एमफार्मसीच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेतील यशाबद्दल उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणेचे सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, सहसंचालक प्रमोद नाईक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या प्रगती आणि यशाबद्दल विशेष कौतुक केले. संस्थेचे प्राचार्य डॉ. के. बी. बुराडे, आर. डी. चकोले, डॉ. सी. जी. कुलकर्णी, डॉ. ए. एच. होसमनी, डॉ. एम. एम. चरडे, प्रा. वाय. एन. गव्हाणे, डॉ. एम. ए. शेंडे, डॉ. ए. एस. कुलकर्णी, डॉ. एस. जी. तापडिया, प्रबंधक डी. ए. कांबळे तसेच सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जात आहेत. शैक्षणिक, कला, क्रीडा व इतर प्रयोगशील उपक्रमांमध्ये महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिले असल्याने विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नेहमीच आपली चमक दाखवून देत यश संपादन केले आहे. याचा आम्हांला अभिमान आहे, असे यावेळी प्राचार्य बुराडे म्हणाले. यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. (वा. प्र.)
फोटो : २३केआरडी०७
कॅप्शन : कऱ्हाडच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. के. बी. बुराडे, आर. डी. चकोले, डॉ. सी. जी. कुलकर्णी, डॉ. ए. एच. होसमनी आदी उपस्थित होते.