Akash Solaskar as the sub-panch of Solashi | सोळशीच्या उपसरपंचपदी आकाश सोळस्कर

सोळशीच्या उपसरपंचपदी आकाश सोळस्कर

पिंपोडे बुद्रुक : सोळशीच्या उपसरपंचपदी आकाश बाळासाहेब सोळस्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक बाळासाहेब सोळस्कर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसपुरस्कृत पॅनेलने सहा जागांवर विजय मिळवला. त्यात आकाश सोळस्कर, हेमलता यादव, विद्या यादव, संतोष उगले, दीप्ती सोनावणे, माणिक आवाडे यांचा समावेश आहे. विरोधकांना तीन जागांवर समाधान मानावे लागले. त्यात प्रवीण सोळस्कर, शोभा देशमुख व अर्चना जंगम हे निवडून आले. आरक्षणात सरपंचपद हे अनुसूचित जाती-जमातीतील महिलेसाठी राखीव झाले होते. मात्र या प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने हे पद रिक्त राहिले. त्यामुळे सरपंचपदाचा निर्णय होईपर्यंत उपसरपंच ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार आहेत.

----- -

फोटो ०६उपसरपंच आकाश सोळस्कर

Web Title: Akash Solaskar as the sub-panch of Solashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.