शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आता अजित पवारांचे लक्ष

By दीपक देशमुख | Updated: August 20, 2023 17:04 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे, सातारा, सांगली आणि  सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. यानिमित्ताने सातारा जिल्ह्यावर अजित पवार यांचे लक्ष राहणार आहे. 

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाने आता पक्षसंघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. संपर्ण राज्यातील पक्षसंघटनेच्या जबाबदारीचे वाटप गटाच्या नऊ मंत्र्यांमध्ये केले आहे. यामध्ये खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे, सातारा, सांगली आणि  सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. यानिमित्ताने सातारा जिल्ह्यावर अजित पवार यांचे लक्ष राहणार आहे. 

राज्यात शरद पवार व अजित पवार गट हे वेगवेगळे झाले असले तरी जिल्ह्यात दोन्ही बाजूंनी कोणतेही शरसंधान झालेले नाही. मात्र, अजित पवार गटाने आता राज्यात पक्षसंघटनेवाढीसाठी ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी मंत्रीनिहाय जिल्ह्याची जबाबदारीचे पत्र प्रसिध्दीला दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर राज्यातील ३६ जिल्हयांची पक्ष संघटना वाढीकरीता जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अजित पवार गटाचे मंत्री हे प्रत्यक्ष जावून सभा, कार्यकर्त्यांशी संवाद, मतदारांशी संवाद, शासनाच्या योजनांचा प्रचार, प्रसार व पक्षसंघटना वाढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

या जबाबदारीच्या वाटपात अजित पवार यांच्याकडे सातारा जिल्हा आला आहे. त्यानी यापुर्वीही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. जिल्ह्यात त्यांना मानणारे कार्यकर्ते असून त्यांचे नेटवर्क चांगले आहे. यामुळ लवकरच जिल्ह्यातील समिकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण