शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेची धुंदी चढलेल्या राज्य सरकारला जनताच खाली खेचेल - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 11:53 IST

नुसता शड्डू ठोकून विकासाचे प्रश्न सुटत नाहीत

सणबूर (सातारा) ‘आपली तब्येत काय, आपण करतोय काय? नुसता शड्डू ठोकून विकासाचे प्रश्न सुटत नाहीत. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्ष काढला, त्यांच्या नावावर मते मागून निवडून येऊन गद्दारी करून पन्नास खोके मिळविले. त्यांना यापुढे जनता माफ करणार नाही,’ असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.तळमावले, ढेबेवाडी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा काळगाव फाटा येथील गणेश मंगल कार्यालयात झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी सभापती सत्यजीतसिंह पाटणकर, सारंग पाटील, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांची उपस्थिती होती.अजित पवार म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या काळात राज्यात जनतेच्या हिताचे अनेक निर्णय झाले. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या काळातील कामे रद्द केली. आता फक्त जाहिरातबाजी करून जनतेची दिशाभूल करत आहेत. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी या जिल्ह्याने दोन खासदार, नऊ आमदार दिले; परंतु मध्यंतराच्या काळात अनेकांनी पक्ष सोडला. त्यामुळे आपल्या जागा कमी झाल्या, परंतु येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोणी गद्दारी करण्याचा अथवा पाय ओढण्याचा प्रयत्न करू नये.’

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेGovernmentसरकार