प्रकाशझोताना अजिंक्यतारा उजळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST2021-02-06T05:13:32+5:302021-02-06T05:13:32+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ऐतिहासिक सातारानगरीत शिवजयंतीला विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच्या पार्श्वभूमीवर ...

प्रकाशझोताना अजिंक्यतारा उजळणार
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ऐतिहासिक सातारानगरीत शिवजयंतीला विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच्या पार्श्वभूमीवर किल्ले अजिंक्यतारावर विद्युत दिवे बसविण्यात येत आहेत. सातारा पालिकेचे कर्मचारी गुरुवारी हे काम करत होते. (छाया : जावेद खान)
०४किल्ले अजिंक्यतारा
---------------
वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान
पिंपोडे बुद्रुक : वन्यजीवांचा मानवी वस्तीसह शिवारातील पिकांमध्ये वावर वाढला असून, रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, मका, गहू, हरभरा, वाटाणा ही पिके जोमात आली आहेत. ज्वारी, गव्हाची कणसे भरू लागली असून रानडुकरे, गवा यांच्या झुंडी उभ्या पिकांमध्ये घुसून धुडगूस घालत आहेत. फुलोऱ्यातील पिकांची या वन्यप्राण्यांकडून नासधूस होत असल्याने वनक्षेत्र परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
०००००००००००
विकासकामांना प्राधान्य द्यावे
पिंपोडे बुद्रुक : गेल्या काही दिवसांपासूनच जिल्हा परिषद सभापती खांदेपालट चर्चेला उधाण आले असले तरी पक्षाने कोणतेही बदल न करता सध्याच्या पदाधिकाऱ्यांद्वारे सुरू असलेल्या विकासकामांना अधिक प्राधान्य द्यावे, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.
जिल्हा परिषद सभापती बदलाबाबत नुकतेच झालेल्या पक्षाच्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला असला तरी पक्षांकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केले गेले नाही. तथापि याबाबतची चर्चा थांबवून विद्यमान पदाधिकारी यांच्या वतीने सुरू असलेल्या विविध विकासकामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.