अजय डांगे यांच्या पॅनेलचे वकील संघटनेवर वर्चस्व
By Admin | Updated: May 4, 2015 00:23 IST2015-05-04T00:18:33+5:302015-05-04T00:23:34+5:30
सातारा : सर्व १६ जागा जिंकल्या

अजय डांगे यांच्या पॅनेलचे वकील संघटनेवर वर्चस्व
सातारा : सातारा जिल्हा वकील संघटनेच्या २०१५-१६ च्या निवडणुकीमध्ये अॅड. अजय डांगे व अॅड. घनश्याम फरांदे यांच्या पॅनेलने सर्व १६ जागा जिंकून दुसऱ्यांदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण १,१४७ वकिलांनी मतदान केले होते. कोरेगाव, खटाव, माण, फलटण, कऱ्हाड, वाई, खंडाळा, पाटण आणि जावळी तालुक्यांतील वकिलांनी मतदानामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता.
या निवडणुकीमध्ये निवडून आलेले उमेदवार असे : अध्यक्षपदाचे विजयी उमेदवार अॅड. अजय डांगे, उपाध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार अॅड. घनश्याम फरांदे, सचिव विजयी उमेदवार अॅड. संग्राम मुंढेकर, सहसचिव विजयी उमेदवार अॅड. अश्विनी झाड, खजिनदार अॅड. विकास जगदाळे. महिला सदस्या विजयी उमेदवार अॅड. प्रीतम जगताप, अॅड. शर्मिला तिवाटणे तसेच सदस्य म्हणून अॅड. अभयसिंह पाटील, अॅड. आसिफ इनामदार, अॅड. दिनेश मोहिते, अॅड. पराग वनारसे, अॅड. प्रणील ससाणे, अॅड. राहुल अडागळे, अॅड. राहुल बोराटे, सतीश कदम, विशाल शिरतोडे हे निवडून आले.
निवडणूक यशस्वी होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. अप्पासाहेब जगदाळे, अॅड. बी. टी. सानप, अॅड. सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी काम केले.
या निवडणुकीत पॅनेल विजयी होण्यासाठी अॅड. डी. एम. जगताप, अॅड. डी. व्ही. देशपांडे, अॅड. काका पाटणकर, अॅड. वाडीकर, अॅड. सारडा, अॅड. दिलीप पाटील, अॅड. चौधरी, अॅड. अरुण काटकर, अॅड. डी. टी. पवार, अॅड. पन्हाळे, अॅड. डी. एम. चव्हाण, अॅड. पार्टे, वाय. एस. जाधव, जे. बी. यादव, श्रीकांत केंजळे, वसंतराव भोसले, सयाजीराव घाडगे, धीरज घाडगे, ललित चव्हाण, बारसवडे, रवींद्र भोसले, संभाजीराव मोहिते, यू. आर. पाटील, अश्विनी काळे, मंजूश्री तलवलकर, ज्योती दिवाकर यांनी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)